एक्स्प्लोर

महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

Maharatra Chunav MVA Seat Sharing: महाविकास आघाडीकडू (Mahavikas Aghadi) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज दुपारी 3 वाजता  महाविकास आघाडीची  वाय बी चव्हाण सेंटर इथं बैठक होणार आहे.  

Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीकडून(Mahavikas Aghadi) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज दुपारी 3 वाजता  महाविकास आघाडीची  वाय बी चव्हाण सेंटर इथं बैठक होणार आहे.  या बैठकीमध्ये  जागा वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल. ज्या 10 ते 15 जागांवर तिढा आहे त्यावर जवळपास मार्ग निघत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये जागा वाटपासाठी पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि अंतिम सूत्र ठरवलं जाईल. 10 ते 15 जागांवर निर्णय झाल्यानंतर जवळपास महाविकास आघाडीचे संभाव्य सूत्र समोर येणार आहे. 

संभाव्य जागावाटपाचं सुत्र काय असणार? 

काँग्रेस-103 ते 108
शिवसेना ठाकरे गट -90-95
 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 80-85
मित्र पक्ष - 3 ते 6

आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात

दरम्यान, आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत असताना महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्या नेमक्या कधी जाहीर होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पहिल्या याद्या यामध्ये अनेकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या उमेदवारी याद्या तयार आहेत. मात्र, आज जागा वाटपावर अंतिम निर्णय झाल्यानंतरच उमेदवारी याद्या पक्षांकडून जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आज बाळासाहेब थोरात दुपारी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम तोडगा काढून जागा वाटपावर निर्णय होईल त्यामुळे दुपारनंतर किंवा उद्या महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या जातील, अशी शक्यता आहे. 

आज जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार 

आज जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार आहे. जागावाटपाबाबत काँग्रेस व ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात असलेले मतभेद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. बाळासाहेब थोरात आज (मंगळवारी) उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी जागा वाटपावर अंतिम चर्चा करणार आहेत. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यानंतर तिन्ही पक्ष पहिली यादी जाहीर करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Jayant Patil on MVA : महाविकास आघाडी किती जागांवर बाजी मारणार, निवडणूक कधी लागणार? बड्या नेत्याने मुहूर्त अन् आकडा सांगितला!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget