Maharashtra : राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 58.25 टक्के मतदान, गडचिरोलीत सर्वाधिक तर मुख्यमंत्र्यांचे ठाणे सर्वात कमी
Maharashtra Voting Percentage : काही मतदानकेंद्रांवर रात्री 8 ते साडेआठ वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा आज महाराष्ट्रात पार पडला. महाराष्ट्राच्या तख्तासाठीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या लढाईतला सर्वात महत्वाचा टप्पा आज पार पडला तो म्हणजे मतदानाचा. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 58.25 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्ये 69.63 टक्के इतकं झालं तर सर्वात कमी ठाणे जिल्ह्यात 49.76 टक्के इतकं झालं. ही आकडेवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची असून त्यानंतरही मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई शहरात 49.07 टक्के, मुंबई उपनगरात 51.76 टक्के, ठाणे जिल्ह्यात 49.76 टक्के आणि पालघर जिल्ह्यात 59.31 टक्के मतदान झालं. नंदुरबार, पालघरमध्ये तर साडेआठ वाजेपर्यंत मतदान प्रतिक्रिया सुरू होती. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हाती जाणार याची फैसला होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान?
- नगर - 61.95
- अकोला - 56.16
- अमरावती - 58.70
- औरंगाबाद- 60.83
- बीड - 60.62
- भंडारा - 65.88
- बुल़ढाणा - 62.84
- चंद्रपूर - 64.48
- धुळे - 59.75
- गडचिरोली - 69.63
- गोंदिया - 65.09
- हिंगोली - 61.18
- जळगाव - 54.69
- जालना - 64.17
- कोल्हापूर - 67.97
- लातूर - 61.43
- मुंबई शहर - 49.07
- मुंबई उपनगर - 51.76
- नागपूर - 56.06
- नांदेड - 56.33
- नंदुरबार - 63.72
- नाशिक - 59.85
- उस्मानाबाद - 58.59
- पालघर - 59.31
- परभणी - 62.73
- पुणे- 54.09
- रायगड - 61.01
- रत्नागिरी - 61.62
- सांगली - 63.28
- सातारा - 64.16
- सिंधुदुर्ग - 62.06
- सोलापूर - 57.09
- ठाणे - 49.76
- वर्धा - 63.50
- वाशिम – 57.42
- यवतमाळ - 61.22