एक्स्प्लोर

Sujay vikhe patil Win : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंचा विजय

अहमदनगरमध्ये ही निवडणूक सुजय विखेंच्या बंडामुळे प्रतिष्ठेची झाली होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटील यांना नगरकर काय कौल देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. पण अखेर सुजय विखेंचा जवळपास दोन लाखांहून अधिक फरकाने विजय झाला आहे.

अहमदनगर : लोकसभा 2019 च्या निवडणुकीतील सर्वात चेर्चेतील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा जवळपास दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. अहमदनगरमध्ये ही निवडणूक सुजय विखेंच्या बंडामुळे प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटील यांना नगरकर काय कौल देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपला मुलगा सुजय विखेंसाठी अहमदनगरमध्ये प्रचारात उतरल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांचा दारुण पराभव केला. अहमदनगर लोकसभा मतदार संघात दीड लाखापेक्षा जास्त आघाडी मिळाल्यानंतर सुजय विखे मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले. चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत असलेल्या विखे यांनी आपला विजय आजोबा बाळासाहेब विखे यांना समर्पित करत जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. आपल्या या विजयानंतर आता वडिलांना देखील हक्काने भाजपमध्ये घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत सुजय विखे यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर राज्यात ऐतिहासिक विजयमध्ये आपली नोंद होईल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांशी लावलेली पैज सुद्धा जिंकू असेसुद्धा सुजय विखे यांनी म्हणाले. Loksabha Result | लोकसभेच्या निकालात कॉंग्रेसच्या पराभवाची कारणं- विखे पाटील | कौल मराठी मनाचा | ABP Majha  यावेळी सुजय विखे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद यांच्यावरही टीका केली. विनाकारण ही निवडणूक प्रतिष्ठेची करून आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कडून केला गेली. तसेच माझे लाड करण्यासाठी कुठल्या आजोबांची गरज नसून जिल्ह्यातील जनतेनेच माझे लाड केले असल्याचा खोचक टोलाही सुजयने शरद पवारांना लगावला. 1991 साली आजोबाच्या पराभवाचा वचपा काढला असून 91 च्या उलट 19 ही संख्या होते आणि त्याचप्रकारे पराजयचा विजयात रूपांतर केले असल्याचेही सुजय विखे यांनी म्हणाले. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत 62.75% मतदान झालं होतं. 2014 मध्ये भाजपकडून दिलीप गांधी आणि राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांच्यात मुख्य लढत झाली होती. त्यावेळी भाजपच्या दिलीप गांधी यांनी राजीव राजळे यांना पराभूत करत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या वर्षी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकीट न देता काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी कडून सुधाकर आव्हाड आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर हे देखील निवडणूक लढवत होते. अहमदनगर लोकसभा मतदार संघ एकूण मतदार एकूण -18 लाख 54 हजार 248 पुरुष - 9 लाख 70 हजार 631 महिला- 8 लाख 83 हजार 529 इतर - 88 अहमदनगर लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा क्षेत्र :  एकूण 6  राहुरी विधानसभा पारनेर विधानसभा श्रीगोंदा विधानसभा नगर विधानसभा पाथर्डी-शेवगाव विधानसभा कर्जत-जामखेड विधानसभा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget