पंढरपुरात समाधान आवताडेंना संधी, परिचारकांचा पत्ता कट, सोलापूर शहर मध्यमधून देवेंद्र कोठे मैदानात
भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabah Election) आपल्या 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंढरपूर आणि सोलापूर शहर मध्यची उमेदवारी जाहीर केली आहे.
BJP Second candidate list News : भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabah Election) आपल्या 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही ठिकाणी नवीन उदेमवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं प्रशांत परिचारक यांचा पत्ता कट झाला आहे. तर सोलापूर शहर मध्यमधून देवेंद्र कोठे यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपने यापूर्वी 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा कली होती. त्यानंतर आज 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अखेर पंढरपूरचा सस्पेंन्स सुटला आहे. पुन्हा समाधान आवताडे यांनाचं उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं प्रशांत परिचारक आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ते पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे. तसेच भगीरथ भालके हे देखील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, शरद पवार उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
सोलापुरातल्या दोन मतदार संघात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून काका आणि पुतण्या मैदानात
सोलापूर शहर मध्य मध्ये भाजप कडून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोलापूर शहर मध्य हा परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ होता. मात्र, जागा वाटपात यावेळेस ही जागा भाजपला सुटली आहे. एबीपी माझाने यांसदर्भात काही दिवसापूर्वी बातमी सांगितली होती. दरम्यान देवेंद्र कोठे यांचे काका महेश कोठे यांना सोलापूर शहर उत्तर मधून राष्ट्रवादी शरद पवार कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनतर पुतण्या देवेंद्र कोठे यांना शहर मध्य मधून विधानसभा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळं सोलापुरातल्या दोन मतदार संघात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून काका आणि पुतण्या मैदानात आहेत.
भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर
भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीतही देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत भाजच्या दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
BJP candidate list: भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात