एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : मोठी बातमी : नाशिकमधून छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आघाडीवर, सिन्नर, इगतपुरीमधून कोण?

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी सुरु झाली असून पहिला कल हाती येत आहे.

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) चर्चा आहे. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीदरम्यान येवला आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाचा पहिला कल हाती आला आहे. मतमोजणीच्या पहिल्याच कलात येवल्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ, मालेगाव मध्य मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आघाडीवर आहेत. 

छगन भुजबळ आघाडीवर

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला म्हणून येवला विधानसभा मतदारसंघाची (Yeola Assembly Constituency) ओळख आहे. महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड  छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे. तर पहिल्या कलानुसार या मतदारसंघातून छगन भुजबळ आघाडीवर आहेत. 

मालेगाव बाह्यमधून भुसेंची आघाडी 

तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात (Malegaon Outer Assembly Constituency) शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार दादा भुसे (Dada Bhuse) हे सलग पाचव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. मात्र यंदा दादा भुसे यांना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे (Adway Hiray) यांचे तगडे आव्हान आहे. भुसे-हिरे या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच पहिला कल हाती आला असून दादा भुसे आघाडीवर आहेत. 

सिन्नरमधून कोकाटे आघाडीवर 

सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Faction) उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. सांगळे यांच्या प्रवेशामुळे ही लढत चुरशीची झाली आहे. आता पहिला कल हाती आला असून महायुतीचे माणिकराव कोकाटे आघाडीवर आहेत. 

नाशिक पूर्व

राहुल ढिकले, भाजप - आघाडीवर

नाशिक मध्य

देवयानी फरांदे, भाजप - आघाडीवर

दिंडोरी

नरहरी झिरवाळ, अजित पवार गट आघाडीवर

 

आणखी वाचा

North Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिक, अहिल्यानगरसह उत्तर महाराष्ट्रात कोणाची हवा? निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा इथे

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Embed widget