(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छोट्या झारखंडमध्ये दोन टप्प्यात तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक का? निवडणूक आयुक्तांनी एका वाक्यातच सांगितलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date Declared : महाराष्ट्रात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात -- ते ... नोव्हेंबर या दरम्यान विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तुमच्या भागात मतदान कधी होणार, हे जाणून घ्या.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच (Vidhan Sabha Election) बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. तर निकाल 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. तर झारखंड राज्यातील निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राज्यात पहिल्यांदाच सहा मोठे पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, यात प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात का होणार निवडणूक?
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 288 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात 9.63 कोटी मतदार आहेत. झारखंडमध्ये 81 मतदारसंघात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र हे झारखंडच्या तुलनेने मोठे राज्य आहे. झारखंडपेक्षा मोठे राज्य असताना देखील महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक का होणार? या संदर्भात बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, गेल्यावेळी झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. नक्षलग्रस्त भाग असल्याने झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर महराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.
कमी मतदान असलेल्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
राज्यात काही ठिकाणी कमी मतदान होते. त्या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. कमी मतदान असलेल्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे.
लोकांना गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार
ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, ते सांगावे लागणार आहे. तसेच राजकिय पक्षांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यांना गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली ते सांगावे लागणार आहे.
Video : महाराष्ट्रात निवडणुका जाहीर! 20 तारखेला एका टप्प्यात निवडणुका
हे ही वाचा :