एक्स्प्लोर

Kolhapur District Assembly Constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस मोठा भाऊ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडे तीन जागा आणि ठाकर गटाकडे दोन जागा राहतील अशी चिन्हे आहेत. 

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District Assembly Constituency) महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) तिढा असलेल्या तीन मतदारसंघांमध्ये आता उमेदवार निश्चित झाले आहेत. काँग्रेसकडून दुसऱ्या यादीमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आज (26 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (Second list of Sharad Pawar NCP)  सुद्धा दुसरी यादी जाहीर करण्यात आली.

इचलकरंजी आणि चंदगड शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून मदन कारंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तीन जागा वाट्याला आल्या आहेत. काँग्रेसच्या वाट्याला पाच जागा जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस मोठा भाऊ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडे तीन जागा आणि शिवसेना ठाकर गटाकडे दोन जागा राहतील अशी चिन्हे आहेत. 

नंदिनी बाभुळकर यांच्या उमेदवारीवरून वाद रंगला

गेल्या काही दिवसांपासून चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये नंदिनी बाभुळकर यांच्या उमेदवारीवरून चांगलाच वाद रंगला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परस्पर मेळावा घेत नंदिनी बाभुळकर यांच्या उमेदवाराला विरोध केला होता. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये नंदिनी बाभूळकर यांचे नाव जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. मात्र, आता दुसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आता अप्पी पाटील कोणती भूमिका घेणार? याची उत्सुकता आहे.

दुसरीकडे, इचलकरंजीमध्ये सुद्धा राहुल आवाडे यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? याची चर्चा होती. हा मतदारसंघ ठाकरे यांच्याकडे जाणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार? याची उत्सुकता होती. मात्र, आता मदन कारंडे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित झाले आहेत. 

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीमधील उमेदवार 

1. 16 एरंडोल सतीश अण्णा पाटील 
2. 111 गंगापूर सतीश चव्हाण 
3. 135 शहापूर पांडुरंग बरोरा
4. 243 परांडा राहुल मोटे 
5. 230 बीड संदीप क्षीरसागर 
6. 44 आर्वी मयुरा काळे 
7. 116 बागलान दीपिका चव्हाण 
8. 119 येवला माणिकराव शिंदे 
9. 120 सिन्नर उदय सांगळे
10. 122 दिंडोरी सुनीता चारोस्कर 
11. 123 नाशिक पूर्व गणेश गीते
12. 141 उल्हासनगर ओमी कलानी 
13. 195 जुन्नर सत्यशील शेरकर 
14. 206 पिंपरी सुलक्षणा शीलवंत 
15. 211 खडकवासला सचिन दोडके
16. 212 पर्वती अश्विनीताई कदम 
17. 216 अकोले श्री अमित भांगरे 
18. 225 अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर 
19. 254 माळशिरस उत्तमराव जानकर 
20. 255 फलटण दीपक चव्हाण 
21. 271 चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर 
22. 279 इचलकरंजी मदन कारंडे

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget