एक्स्प्लोर

काँग्रेसच्या 'हाता'तून एक आमदार गेला मात्र जुना शिलेदार करणार घरवापसी, इगतपुरीत पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती?

Nirmala Gavit :  2019 च्या निवडणुकीत हिरामण खोसकर यांनी निर्मला गावीत यांचा पराभव केल्यानंतर पुन्हा हे दोघे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे. 

नाशिक माजी आमदार निर्मला गावीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर निर्मला गावीत यांना खोसकरांविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  निर्मला गावित यांनी 2019 च्या निवडणूकपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश  केला होता.  निर्मला गावीत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब  गटात आहेत.  निर्मला गावीत यांच्यां प्रवेशासाठी आपल्यावर अन्याय करण्यात आल्याचा हिरामण खोसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना आरोप केला होता.

हिरामण खोसकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा निर्मला गावीत यांनी  केला होता.  काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत अद्याप पक्षाकडून बोलावणे नाही, नाना पटोले यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी  बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर नाही.  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी देखील उमेदवारी बाबत चर्चा केल्याची माहिती निर्मला गावीत यांनी दिली आहे.  शिवसेना उबाठाला जागा सुटावी यासाठी आग्रही मात्र काँग्रेस जागा सोडत नसल्यानं  निर्मला गावीत  काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.  दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्यानं पक्ष प्रवेशाला अडचण येणार नाही,मात्र अद्याप वेळ तारीख ठरली नाही.  2019 च्या निवडणुकीत हिरामण खोसकर यांनी निर्मला गावीत यांचा पराभव केल्यानंतर पुन्हा हे दोघे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे. 

निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

माजी आमदार निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली होती. मात्र 2019 साली त्यांचा पराभव झाला . आता आगामी निवडणुकीत त्यांची दिशा काय याविषयी उत्सुकता वाढली आहे.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ सुरवातीपासूनच काँग्रेसचा गड राहिलाय तर दोन वेळा इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पसंती दिलीय. 1980 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास 1980, 1985, 1995, 2009 आणि 2014 अशा पाच निवडणुकात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तर 1999 आणि 2004 या सलग दोन निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा मतदार संघावर फडकला आहे. 1999 मध्ये पांडुरंग गांगड तर 2004 मध्ये काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. 1990 च्या एकाच निवडणुकीत मात्र यादवराव वांबळे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुललं.

हे ही वाचा :

काँग्रेसला मोठा धक्का, विद्यमान आमदाराने साथ सोडली, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Baramati Crime News: पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Baramati Crime News: पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Embed widget