मोठी बातमी : मधुरिमाराजेंचा उमेदवारी अर्ज मागे, कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, आता उमेदवार कोण?
नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, असे शाहू महाराज म्हणाले.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) काँग्रेसची उमेदवारी मिळूनही अवघ्या काही तासात उमेदवारी रद्द करण्यात आल्याने राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात अभूतपूर्व ट्विस्ट झाला आहे. सकाळपासून राजेश लाटकर उमेदवारी अर्ज माघार घेणार की नाही अशी चर्चा असतानाच उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना मधुरिमाराजे यांनीच कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिली.
काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये राहिलेला नाही
या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर उत्तरच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये रद्द करण्यात आली. मात्र, आता नव्याने दिलेल्या उमेदवारानं सुद्धा उमेदवारी माघार घेतल्याने काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये राहिलेला नाही, अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सतेश पाटील यांना विशेष करून कोल्हापूर उत्तरच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून तगडा झटका बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचा उमेदवार विरुद्ध अपक्ष उमेदवार अशीच लढत होणार का? आता असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजेश लाटकरांकडून माघार नाहीच
राजेश लाटकर यांनी उमेदवारी माघार घ्यावी यासाठी कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्यासह त्यांच्या यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. इतकेच नव्हे तर रविवारी सुद्धा छत्रपती घराण्याकडून राजेश लाटकर यांची निवासस्थानी जाऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र राजेश लाटकर यांनी उमेदवारी माघार घेण्याबाबत कुठलेही संकेत दिले नव्हते. त्यामुळे आज तरी उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते अर्ज माघार घेणार का? याकडे लक्ष होते. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे एक प्रकारे नाही नाईलाजस्तव अशा स्थितीत लढू शकत नसल्याचे सांगत शाहू महाराज यांनीच मधुरिमाराजे यांनीच अर्ज माघार घेतल्याचे सांगितले. त्यामुळे हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला की पक्षीय पातळीवर झाला याबाबतही खुलासा होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी बोलण्यासाठी कोणत्याही मनस्थितीत नसल्याचे सांगितलं. तसेच मी याबाबत नंतर सविस्तर बोलेन असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या