एक्स्प्लोर

Atul Deshmukh: खेड-आळंदीत शरद पवारांच्या शिलेदाराची बंडखोरी; मविआने डावललं अन् अतुल देशमुखांनी बंडखोरीचं उगारलं अस्त्र

Atul Deshmukh: बाबाजी काळेंनी अर्ज दाखल केला. मात्र, मविआने डावलले म्हणून अतुल देशमुखांनी बंडखोरीच अस्त्र उगारलं आहे. आता 4 नोव्हेंबरपूर्वी हे बंड थंड होणार की देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Khed Alandi Maharashtra Assembly Constituency: पुणे- खेड आळंदी विधानसभा मतदार संघात महायुती विरुद्ध  महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असला तरी इथं नवा ट्विस्ट समोर आला आहे. शरद पवार गटातील अतुल देशमुखांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली आहे. अजित पवारांनी इथं दिलीप मोहिते पाटलांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून ऐनवेळी ही जागा शिवसेना उबाठा गटाला दिली. बाबाजी काळेंनी अर्ज दाखल केला. मात्र, मविआने डावलले म्हणून अतुल देशमुखांनी बंडखोरीच अस्त्र उगारलं आहे. आता 4 नोव्हेंबरपूर्वी हे बंड थंड होणार की देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढविली 

अतुल देशमुख यांनी याआधी खेड तालुक्यात यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी आमदार दिलीप मोहिते आणि स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अतुल देशमुख यांनी अपक्ष असताना 55 हजार मते पडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा देशमुख यांनी 2024 ची खेड विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याचा निश्चय केल्याचं दिसून येत आहे. अतुल देशमुख यांनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस राहणार असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाला दिली आहे. यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत बंडोखोरीची शक्यता आधीच वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुख यांनी शक्तीप्रदर्शन करत मेळावा घेतला होता. 

2019 मध्ये काय झालं होतं...

खेड आळंदी मतदार संघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप दत्तात्रय मोहिते विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना उमेदवार सुरेश नामदेव गोरे यांचा पराभव केला होता. दिलीप मोहिते यांना 96866 तर गोरे यांना 63624 मते मिळाली होती. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले अतुल देशमुख यांनी निवडणुकीत रंगत आणली होती. त्यांनी 53874 मते घेतली होती.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
Sameer Bhujbal vs Suhas Kande: भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari: अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरेंना वाचाळपणा भोवला, पदावरुन पायउतार केल्याची चर्चा
Congress Internal Rift: प्रदेशाध्यक्ष Sapkal यांना डावलून नेते Thorat यांच्या दारी, Nashik काँग्रेसमध्ये उभी फूट
Faridabad Terror Bust: 'आम्ही त्यांना ओळखत नाही', भाड्याच्या घरात 350kg स्फोटके, गावकरी अनभिज्ञ
Terror Crackdown: फरीदाबादमध्ये डॉक्टरच्या घरातून ३५० किलो स्फोटके जप्त, Dr. Adil सह तिघे अटकेत
Karuna Sharma Politics : दारूचे कारखाने यांचे, पण पिणारे गोरगरिबांची मुलं, करुणा शर्मांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
Sameer Bhujbal vs Suhas Kande: भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Nashik Crime: 'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
Ayushmann Khurrana Charged Rs 1 For Movie Andhadhun: हिरोनं फिल्मची स्टोरी ऐकल्यानंतर फी म्हणून घेतला फक्त रुपया; त्यात काळजाचा ठोका चुकवणारा सस्पेन्स, 32 कोटींमध्ये कमावले 456 कोटी
हिरोनं फिल्मची स्टोरी ऐकल्यानंतर फी म्हणून घेतला फक्त रुपया; त्यात काळजाचा ठोका चुकवणारा सस्पेन्स, 32 कोटींमध्ये कमावले 456 कोटी
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
Embed widget