Chinchwad Assembly constituency: '...म्हणून आयटी इंजिनिअर चिंचवड विधानसभेच्या रिंगणात उतरला', दीड लाख आयटी मतदारांनी ठरवलं तर आमदार होणार?
Chinchwad Assembly constituency: हिंजवडीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा या तीन मूलभूत गरजा ही पूर्ण करू शकलेला नाही. म्हणूनचं सचिन सिद्धे या घटकाचा आवाज विधानसभेत उठवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
पुणे: चिंचवड विधानसभेच्या रिंगणात आयटी इंजिनिअर सचिन सिद्धे देखील उतरले आहेत. दीड लाखांच्या घरात आयटी मतदार असताना ही आजपर्यंत हिंजवडीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा या तीन मूलभूत गरजा ही पूर्ण करू शकलेला नाही. म्हणूनचं सचिन सिद्धे या घटकाचा आवाज विधानसभेत उठवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आजवर चिंचवडमध्ये निवडून आलेल्या आमदाराला दीड लाखाच्या आसपासचं मत मिळालीत, हे पाहता इथल्या दीड लाख आयटी मतदारांनी ठरवलं तर सचिन सिद्धे हे आयटीवाल्यांचे आमदार होऊ शकतात. पण एसीत बसून काम करणारे आयटीवाले बाहेर डोकावून त्यांच्यासाठी झगडणाऱ्या सचिन सिद्धेकडे पाहणार का? त्याच्यावर विश्वास दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे.
आपल्याला पडलेले असंख्य प्रश्न आहेत असंख्य अडचणी आहेत त्या अडचणींना कोणीही वाली राहिला नाही आपल्या अडचणींना आणि समस्यांना कोणताही उत्तर मिळत नाही त्या कुणी सोडवत देखील नाही. असंख्य मुद्दे आहेत असंख्य अडचणी आहेत पण आमचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत रस्ते रस्त्यावरील खड्डे आणि होणारे ट्रॅफिक दुसरा आहे पाणी. पाण्याची मोठी विकट समस्या दिसून येते. शहर मोठ्या प्रमाणात वाढतंय पण पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारे केला पाहिजे ते होत नाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होतोय.
शहर वाढतंय परिसर वाढतोय पाण्याचा नियोजन होत नाहीये. टँकर माफिया मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तिसरा प्रश्न आहे कचरा. कचऱ्याने आपले आरोग्य, शहर बकाल होत आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे कचऱ्याचा विघटन केलं पाहिजे, व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जनता गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त आहे म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. आयटीसी संदर्भ संदर्भात दीड लाख मतदार आहे. आम्ही अभ्यास केला आहे, हा सर्व मतदार राजा माझ्या पाठीशी राहणार आहे. यामध्ये असे काही मतदार आहेत जे कधी मतदानासाठी आलेले नाहीत तो मतदार राजा कंटाळा आलेला आहे किंवा कामानिमित्त बाहेर आहे. आम्ही त्याबाबतही जनजागृती करत आहोत. तुम्ही जर मतदान केलं तर समस्या सोडवता येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही मतदान करा मतदानासाठी बाहेर पडा असे सचिन सिद्धे यांनी म्हटलं आहे.
इतक्या वर्षांमध्ये मतदारांना कोणी चांगला पर्याय नव्हता त्यांच्याकडे नोटा हा पर्याय होता. पण, आता पण त्यांच्याकडे आता सचिन सिद्धे यासारखा चांगला एक पर्याय आहे. आता नोटा देखील माझ्या बाजूने आहे. अशात सचिन सिद्धे हा आयटी अभियंता आहे. नोकरदार वर्गातील मुलगा आहे. सर्वसामान्य वर्ग एका सोसायटीत राहणारा मुलगा. ज्याने सर्व भोगले ज्याने सर्व समस्यांना तोंड दिले आहे. तो आता लढण्यासाठी पुढे आला आहे. व्हाट्सअप वर बोलून काही होणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. प्रवाहामध्ये आपल्याला यावं लागणार आहे त्याशिवाय सुधारणा होऊ शकणार नाही असंही सचिन सिद्धे यांनी पुढे म्हटलं आहे.