एक्स्प्लोर

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, कोल्हापूर उत्तर, चंदगड आणि इचलकरंजी या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीकडून उमेदवार देण्यामध्ये आघाडी घेतली असतानाच महाविकास आघाडीकडून सुद्धा आता उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर कोल्हापूरमधील लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. मात्र अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, कोल्हापूर उत्तर, चंदगड आणि इचलकरंजी या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दक्षिणमधून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांची अपेक्षेप्रमाणे उमेदवारी काल जाहीर करण्यात आली. करवीरमधूनही स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रदीप नरके रिंगणात असतील. 

हातकणंगेलत कोणाला संधी दिली जाणार? 

दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून चर्चा सुरू होती. मात्र, या मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान आमदार राजू बाबा आवळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. हा मतदारसंघ जनसुराज्य शक्ती पक्षाला सुटण्याची चिन्हे आहेत. मात्र, अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातून जनसुराज्यकडून अशोकराव माने रिंगणात असणार की भाजपकडून कोण असणार याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे शाहूवाडीमधून आमदार विनय कोरे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. राधानगरी मतदारसंघातून माजी आमदार के पी पाटील यांनी मशाल हाती घेत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवली आहे. त्यांचा सामना विद्यमान शिंदे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी होणार आहे.

चंदगडमध्ये नंदाताईंच्या उमेदवारीला विरोध

कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये लढत दोन महिन्यांपूर्वीच लढत निश्चित झाली आहे. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये सामना रंगला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील पुन्हा एकदा रिंगणात असणार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवारामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिल्या यादीमध्ये नंदाताई बाभूळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. नंदाताई बाभुळकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीमधील नेत्यांमधूनच विरोध होत असल्याने त्यांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये येणार का? याची उत्सुकता आहे. 

इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीकडून कोण असणार? 

दुसरीकडे, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचा चेहरा अजूनही ठरलेला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य यादीमध्ये या मतदारसंघातून मदन कारंडे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र पहिल्या यादीमध्ये त्यांचं सुद्धा नाव आलेलं नाही. त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा कोणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये अपक्ष निवडून आलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वत:च्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून पाठिंबा दिला जातो की त्यांच्या विरोधात उमेदवार दिला जातो याचेही उत्तर अजून मिळालेलं नाही.

शिरोळमध्येही लढत अजून निश्चित नाही

या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील इच्छुक आहेत. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार उल्हास पाटील हे इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारी पडते याकडे तालुक्याचे लक्ष आहे. सर्वाधिक चर्चेचा विषय झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर भाजपकडून आक्रमकपणे दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये खासदार धनंजय महाडि यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे म्हटलं आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली त्या यादीमध्ये राजेश क्षीरसागर यांना मात्र स्थान मिळालेलं नाही. महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने महाविकास आघाडीकडून पत्ता खोलला गेलेला नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Embed widget