कोपरगाव विधानसभेची निवडणूक कोल्हे कुटुंबाविना? माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची भावनिक पोस्ट
भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे ( MLA Snehalata Kolhe) यांची सोशल माध्यमात एक पोस्ट शेअर केली आहे. भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.
Kopargaon Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इच्छुकांना नेत्यांच्या गाठी भेटी सुरु केल्या आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशातच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. काळे आणि कोल्हे कुटुंबात मोठा राजकीय संघर्ष आहे. मात्र, हा संघर्ष मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे ( MLA Snehalata Kolhe) यांची सोशल माध्यमात एक पोस्ट शेअर केली आहे. भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.
नेमकं काय म्हणाल्या स्नेहलता कोल्हे?
कोपरगाव विधानसभेची निवडणूक कोल्हे कुटुंबाविना होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण, कोल्हे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांना साद घातली आहे.
कार्यकर्त्यांना आवाहन करणारा संदेश त्यांनी दिला आहे. कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भूमिका असते असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विवेक कोल्हेंच्या कार्याची दखल घेतली असल्याची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे कोल्हे यांचे पोस्टच्या माध्यमातून संकेत दिले आहेत. कोपरगावची जागा अजित पवार गटाकडे गेल्याने कोल्हे यांची राजकीय कोंडी झाली होती. कोपरगावचा तिढा सोडवण्यात भाजपच्या पक्षश्रेष्ठींना यश आल्याचे कोल्हे यांच्या पोस्ट वरून सिद्ध होत आहे.