एक्स्प्लोर

Sushma Andhare : पोर्श हिट अँड रन केसला 6 महिने पूर्ण; गुन्हेगारांना वाचविणारे गुन्हेगार कोण टिंगरे साहेब?, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

मी, सुप्रिया सुळे, आमचे पक्ष कोणीही या नोटीशींना घाबरत नाही, कायदेशीर कारवाई करायची असेल तर करा,असे आव्हानही त्यांनी दिले.वडगाव शेरी मधील एक नागरिक म्हणून या प्रकरणावर मी बोलत आहे, असेही त्यांनी सागितले.

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाला 6 महिने पूर्ण झाले.  या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. सुषमा अंधारे यांनी या मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. 6 महिने झाल्यामुळे आज त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि या प्रकरणात अग्रवाल कुटुंबियांवर आणि त्यांना मदत केलेले विद्यमान आमदार सुनिल टिंगरेंवर चांगलाच हल्लाबोल केला. पोर्श हिट अँड रन प्रकरणात गुन्हेगारांना वाचविणारे गुन्हेगार कोण टिंगरे साहेब?, असादेखील प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

लोकप्रतिनिधी म्हणून अपघात स्थळी जाणे, निष्पाप बळी पडलेल्या युवांच्या कुटुंबियांना भेटणं गरजेचे होते, की पोलीस स्टेशन, ससून आणी एकसाईज च्या कार्यालयाना जाणे महत्वाचे होते?  या प्रकरणात राजकीय दबाव आणून गुन्हेगारांना वाचविणारेच खरे गुन्हेगार नाहीत का ? अशा अनेक बोचऱ्या प्रश्नांची सरबत्तीच उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली.पोर्शमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या बाळासोबत अन्य अल्पवयीन मुले कोण होती. त्यात कोणा नेत्याचा मुलगा होता का,हे टिंगरे यांनी सांगावे, असे आव्हानही अंधारे यांनी दिले. 

'टिंगरे यांच्या नोटिशीना घाबरत नाही, पण निष्पापाना न्याय मिळाला पाहिजे'

मी, सुप्रिया सुळे, आमचे पक्ष कोणीही या नोटीशींना घाबरत नाही, कायदेशीर कारवाई करायची असेल तर करा,असे आव्हानही त्यांनी दिले.वडगाव शेरी मधील एक नागरिक म्हणून या प्रकरणावर मी बोलत आहे, असेही त्यांनी सागितले. या प्रकरणात विविध वृत्तपत्रात पोलखोल करणाऱ्या आलेल्या बातम्यांची कात्रणेही त्यांनी पुष्टीसाठी वाचून दाखवली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, तुम्ही पिझ्झा बर्गर घेऊन एका आरोपीसाठी गेला होता, गोरगरिबांचे काम करणे ही लोकप्रतिनिधीचे काम आहेत एका आरोपीसाठी पिझ्झा बर्गर घेऊन जाणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहेत याचा विचार तुम्ही करावा. रक्ताचे नमुने बदललेल्या आरोपीला मिळालेल्या रकमेची चौकशी पोलीस करणार होते मात्र ती चौकशी का थांबली?  या तपासाची परवानगी पोलीस आयुक्तांनी मागितली होती मात्र ही चौकशी का थांबली ग्रह खात्यात सोबत सत्तेत असणारी पार्टनरशिप हे काय वेगळं सांगायची गरज नाही.पोर्षे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत आणखीन एक मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजून झाला नाही. पोर्शे कार अपघात प्रकरणात तुमचा सहभाग होता हे तुम्ही अमान्य करू शकाल का?हे प्रकरण चालू असताना तुम्ही कुठे गायब होतात पोलीस आणि माध्यमांच्या समोर तुम्ही का आला नाही? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी दबाव केला? तुम्हाला उमेदवारी देताना हाच मुद्दा अडचणीचा होता ही महायुतीतील चर्चा आमच्यापर्यंत पोहोचले आहे.

 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget