Vidhan Parishad Election Live : भाजपचे पाचही उमेदवार विजयी, प्रसाद लाड यांची दुसऱ्या फेरीत बाजी
Maharashtra Vidhan Parishad Election Live 2022 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट
BJP : विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहे. प्रसाद लाड यांनी दुसऱ्या फेरीत बाजी मारली आहे.
भाजपचे पाच विजयी उमेदवार खालीलप्रमाणे :
राम शिंदे
श्रीकांत भारतीय
उमा खापरे
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विजयी उमदेवार
- शिवसेना -सचिन अहिर, आमश्या पाडवी
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर
- भाजप - राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर
शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी झाले आहेत.
भाजपचे राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर विजयी झाले आहेत
राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे आणि भाजपच्या राम शिंदे यांचा विजय झाला आहे.
राष्ट्रवादीच्या कोट्यातील बाद ठरवण्यात आलेल्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे. त्यामुळे मतमोजणीला विलंब होणार असल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या कोट्यासाठी आता 25.71 चा नवा कोटा ठवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या कोट्यासाठी आता 25.71 चा नवा कोटा ठवण्यात आला आहे.
विधानपरिषदेच्या मतमोजणीमध्ये आता दोन्ही बाजूंना धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे.
विधानपरिषदेच्या मतमोजणीमध्ये आता दोन्ही बाजूंना धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे.
विधानपरिषदेच्या मतमोजणीमध्ये आता दोन्ही बाजू आक्रमक झाल्या असून दोन्ही बाजूंकडून प्रत्येक मतावर आक्षेप घेण्यात येतोय. त्यामुळे मतमोजणीला विलंब होत असल्याचं दिसून येतंय.
भाजपच्या उमा खापरेंच्या एका मताला महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असून शेवटच्या 25 मतांची छाननी सुरू आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असून शेवटच्या 25 मतांची छाननी सुरू आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेचा निकाल लागणार असून त्यामध्ये अपक्षांच्या मदतीने भाजपचे पाचही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विधानपरिषदेसाठी पहिल्या टप्प्याची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या राजराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाल्याचं स्पष्ट झालं. या मतावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. हा महाविकास आघाडीसाठी धक्का असल्याचं सांगितलं जातंय.
विधानपरिषदेसाठी पहिल्या टप्प्याची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या राजराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाल्याचं स्पष्ट झालं. या मतावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. हा महाविकास आघाडीसाठी धक्का असल्याचं सांगितलं जातंय. हे मत बाद होण्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी सुरू आहे.
विधानपरिषदेसाठी पहिल्या टप्प्याची मतमोजणी पूर्ण झाली असून राजराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाल्याची माहिती आहे. हा महाविकास आघाडीसाठी धक्का असल्याचं सांगितलं जातंय. जे मत बाद झालं आहे त्यावर भाजपच्या वतीनं आक्षेप घेण्यात आला होता.
विधानपरिषदेसाठी पहिल्या टप्प्याची मतमोजणी पूर्ण झाली असून काहीच वेळात निकाल जाहीर होणार आहे.
LIVE : सचिन अहिर समर्थकांनी गुलाल उधळला, विधानपरिषदेचा पहिला निकाल काही क्षणात
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
तब्बल दोन तासांनंतर विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अवघ्या काहीच वेळात निकाल समोर येणार आहे.
विधानपरिषदेसाठी पहिल्या पसंतीची मतांची विभागणी झाल्यानंतर सर्वात जास्त मते पडलेल्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते प्रथम विभागली जातात. उमेदवारांना पहिल्या पसंतीची समान मते मिळाल्यास ईश्वरी चिठ्ठीच्या आधारे कोणत्या उमेदवारांची मतांची विभागणी याचा निर्णय घेतला जातो.
विधानपरिषदेचा निकाल काही वेळेत येणार असून त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते विधानभवनाच्या परिसरात आमने-सामने आले आहेत. या दरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
भाजपच्या दोन उमेदवारांचे मत बाद करावं अशी तक्रार काँग्रेसने केली होती. भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. काँग्रेसचा आक्षेप आता राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.
आज झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला पाच वाजता सुरुवात होणार होती. पण अद्याप ती सुरु झाली नाही. काँग्रेसने केलेल्या तक्रारीमुळे हा विलंब होत असल्याचं सांगण्यात येतंय.
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी विधानभवनाच्या परिसरात गर्दी केली आहे. एकनाथ खडसेंच्या विजयाची खात्री असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात येत असून विजयाचा जल्लोष करण्यासाठी समर्थक एकवटले आहेत.
Vidhan Parishad Election Live : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जगताप यांची मतदान पत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीसाठी 285 आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या उमेदवारांचा कोटा पूर्ण झाला आहे. महाविकास आघाडीकडून तिसऱ्या क्रमांकाची मतं काँग्रेसच्या भाई जगताप यांना मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Vidhan Parishad Election Live : सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला शेवटचा अर्धा तास शिल्लक असतानाही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती.
आपल्याला मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीला कोणताही दिलासा मिळाला नसून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.
Vidhan Parishad Election Live : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. सुप्रीम कोर्टात अद्यापही मलिक आणि देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. परंतु अंतिम निकाल अद्यापही आलेला नाही.
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 30 मिनिटे उरली असताना महाविकास आघाडीची धावाधाव सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांचं मतदान अद्याप बाकी आहे.
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही मिनिटे उरली असताना विधानभवनात भेटीगाठींचा जोर वाढला आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप आणि सुनील केदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
Vidhan Parishad Election Live : बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि राजेश पाटील तिघेही विधानभवनाच्या आवारात पोहोचले आहेत.
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणूक : दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 275 जणांचं मतदान, अद्याप दहा आमदारांचं मतदान बाकी
फोडाफोडीचं राजकारण यशस्वी होणार नाही, आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं आहे. मतांच्या समीकरणाचा फायदा मविआच्या सहाव्या उमेदवाराला- नाना पटोले
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणूक : दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 246 मतदान
विधान परिषदेसाठी मतदान होतंय.. आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व पक्षांनी रणनीती आखलेली आहे... यात खरी चुरस आहे ती काँग्रेस आणि भाजपमध्ये... कारण काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्याचत अटीतटीची लढत आहे... मात्र असं असतानाही राज्यातली खेळीमेळीची राजकीय संस्कृती आज विधान भवनात दिसून आली... एकीकडे मतदान प्रक्रीया सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आमने सामने आले. आणि या नेत्यांमध्ये त्यावेळी अगदी खेळीमेळीचा संवाद झालेला दिसून आला...
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषदेत मतदान करण्यासाठी रवी राणा विधानभवनात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणखी 5 मतांची बेगमी, दोन्ही उमेदवारांना दिला प्रत्येकी 28 मतांचा कोटा, रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना 28 मतांचा कोटा देवून देवून राष्ट्रवादीने दोघांचाही निवडून आणण्याचा मार्ग मोकळा केला असल्याची सूत्रांची माहिती
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणूक दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 203 मतदान
दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे.
विरार : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर हे आपल्या विरार येथील बंगल्यावरुन विधानपरिषदेत मतदान करण्यासाठी निघाले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथील विरार फाटा हून बोईसरचे आमदार राजेश पाटील त्यांना जॉईन होतील आणि दोघे मुंबईच्या दिशेने निघतील आणि या दोघांना क्षितीज ठाकूर विधानपरिषदेत जॉईन होतील.
Vidhan Parishad Election Live :विधानपरिषद निवडणूक सकाळी 11 वाजेपर्यंतचे एकूण 142 मतदान
अनेक आमदार, लोकप्रतिनिधी आपल्याला महागड्या गाड्यांमध्ये येताना बघायला मिळतात. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांनी टॅक्सीने प्रवास केला.. शर्मा हे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे आले, मतदान केलं आणि टॅक्सीत बसून निघून गेलेत. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय.
नाना पटोले यांचं ट्वीट चर्चेत
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे मतदान सुरू, विधानसभा आमदाराला मतदान केंद्रापर्यंत पक्षाच्या विधानपरिषद सदस्याची सोबत, शिवसेनेची कोकणातील आमदारांपासून मतदानाला सुरूवात
शिवसेनेचे कोकणातील आमदार सर्वात आधी मतदान करणार, मुख्यमंत्री आणि सुनील तटकरे, सुप्रिया सुळे यांच्यातील बैठक संपली
भाजप आमदार मुक्ता टिळक विधानभवनात दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या मतदान करणार आहे. तब्येतीपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.
Vidhan Parishad Election Live : आधी राष्ट्रवादी, मग काँग्रेस आणि शेवटी शिवसेना आमदार मतदान करणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रचंड खबरदारी घेतली आहे.
Vidhan Parishad Election Live : काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाकरता प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. विधानभवनात बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्याकडून प्रत्येक काँग्रेस आमदाराला मतदान प्रक्रियेचे वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं जात आहे. कोणतीही चूक होऊ नये याकरता काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. सध्या काँग्रेसच्या सात आमदारांचे मतदान पार पडले आहे. महाविकास आघाडीतील मतदानाचा क्रम ठरला आहे. सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस, मग काँग्रेस आणि सर्वात शेवटी शिवसेना मतदान करेल. काँग्रेसकडून 5-5 आमदारांच्या गटाला मतदानाकरता पाठवले जात आहे.
Vidhan Parishad Election Live : अनिल देशमुख आणि नवाब मलिक मतदानाच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात, हायकोर्टानं परवानगी फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Vidhan Parishad Election Live : शिवसेना आमदारांच्या मतदानापूर्वी सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात भेटीला
Dugdhabhishek for Eknath Khadse win : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्याने खडसे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधानपरिषदेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असून एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. खडसे या निवडणुकीत विजयी व्हावे यासाठी आज जळगावातील महादेव मंदिरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तर्फे दुग्धाभिषेक करत महादेवाला विजयासाठी साकडे घालण्यात आले.
विधानपरिषद निवडणुकीत आमदार रवी राणा मतदान करणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात... आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांची करडी नजर.. रवी राणा यांच्याविरुद्ध वारंट जारी असल्याने ते मुंबईच्या बाहेर.. रवी राणा मुंबईत आले की त्यांना ताब्यात घेऊ शकतात म्हणून आमदार रवी राणा अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळतेय.. रवी राणा हे मतदान करतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आले.. केव्हा करणार ही वेळ मात्र त्यांनी दिली नाही.. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1 वाजता नागपूरच्या हायकोर्ट येथे त्यांच्या वकिलांमार्फत वारंट रद्द केल्या जाईल त्यानंतर आमदार रवी राणा दुपारी मतदान करायला जातील...
Vidhan Parishad Election Live : आमदार लक्ष्मण जगताप मुंबईला निघाले, जगताप अॅम्ब्युलन्सनं मतदानासाठी पोहोचणार
Ravi Rana Vote : विधानपरिषद निवडणुकीत आमदार रवी राणा मतदान करणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. रवी राणा यांच्याविरुद्ध वारंट जारी असल्याने ते मुंबईच्या बाहेर आहेत. रवी राणा मुंबईत आले की त्यांना ताब्यात घेऊ शकतात म्हणून आमदार रवी राणा अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळत आहे. रवी राणा हे मतदान करतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे, परंतु केव्हा करणार याची वेळ मात्र त्यांनी दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1 वाजता नागपूरच्या हायकोर्ट येथे त्यांच्या वकिलांमार्फत वारंट रद्द केला जाईल त्यानंतर आमदार रवी राणा दुपारी मतदान करायला जातील, असे कळतं.
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषदेसाठी आतापर्यंत 100 आमदारांचं मतदान पूर्ण, राष्ट्रवादीच्या 45 आमदारांचं मतदान
Vidhan Parishad Election Live : शिवसेना आमदारांची बस अखेर विधानभवनात पोहोचली, आमदारांची घोषणाबाजी
Vidhan Parishad Election Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा विधानभवनात दाखल झाला आहे. तर पवाईतील हॉटेल वेस्टिनमधून निघालेली शिवसेना आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकली आहे. ही बस विधानभवनात पोहोचण्यासाठी आणखी 15 ते 20 मिनिटं लागण्याची शक्यता आहे.
Vidhan Parishad Election Live : विधान परिषद निवडणूक, पहिल्या तासाभरात 65हून अधिक आमदारांचं मतदान, भाजपच्या 50तर राष्ट्रवादीच्या 15 आमदारांचं मतदान, भाजप आणि काँग्रेसची विधानभवनात खलबतं, आमदारांबरोबर बैठका
CM Uddhav Thackeray Updates : वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाकडे रवाना, पोलिसांचा चोख बंदोबस्त
महाविकास आघाडीचे तीन नेते एकत्रित बसून मतांचा पसंतीक्रम देणार, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची निवड, शिवसेनेकडून अनिल परब यांची पसंतीक्रम ठरवण्यासाठी निवड
Vidhan Parishad Election Live : काँग्रेस आमदार काही वेळात विधानभवन येथे आल्यानंतर नेते घेणार मिटींग, काँग्रेस आमदारांचं मतदान कसं करायचा याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल, त्याबाबत आमदारांना काँग्रेस नेते सूचना करणार आहेत. अद्याप काँग्रेसच्या कुणीही मतदान केलेलं नाही
विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत 20 आमदारांचं मतदान, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचं सर्वात आधी मतदान, भाजप आणि काँग्रेसचे आमदार बसेसमधून विधानभवनात दाखल, शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून रवाना, ट्रॅफिकमध्ये अडकले, सर्वच पक्षांचे प्रमुख नेते विधानभवनात दाखल
विधान भवनातील भाजप कार्यालयात भाजपचे सर्व आमदार बसले आहेत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कोणत्या आमदाराने मतदान करावे हे सांगून पाठवत आहेत
Vidhan Parishad Election Live : मतदान प्रक्रियेला सुरुवात, हरिभाऊ बागडे यांनी पहिला मतदानाचा अधिकार बजावला, राष्ट्रवादीकडून पोलिंग एजंट म्हणून प्राजक्त तनपुरे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे तर भाजपकडून संजय कुटे, अतुल भातखळकर, रणधीर सावरकर, आशीष शेलार, राहुल नार्वेकर
Vidhan Parishad Election Live : मतदानासाठी विधानभवनासाठी रवाना झालेल्या शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. शिवसेनेची बस मुंबई पश्चिम द्रुतगती महार्गावर अडकली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज पहाटे डंपरचा अपघात झाला होता
शिवसेना आमदारांना वाहतूक कोंडीचा फटका, आमदार पश्चिम दृतगती मार्गावर वाहतूक कोंडीत अडकले
Sanjay Raut : महाविकास आघाडीची एकजूट किती आहे हे संध्याकाळी समजेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
Haribhavu Bagade casts his vote : विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिलं मत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी नोंदवलं. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Vidhan Parishad Election LIVE : भाजप आमदार हरिभाऊ बागडे पहिलं मतदान करणार
Aaditya Thackeray leaves for Vidhan Bhawan : विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी शिवसेनेचे आमदार पवईतील हॉटेल वेस्टिनमधून निघाले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे खासगी गाडीतून न जाता आमदारांसोबतच बसमधून विधानभवनाकडे रवाना झाले आहेत.
शिवसेना आमदारांची बस वेस्टिन हॉटेलमधून विधान भवनाकडे रवाना झाली आहे. या बसमध्ये शिवसेना आमदारांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील आहेत.
Vidhan Parishad Election Live : दोन बसमधून भाजप आमदार विधानभवनात दाखल झाल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले आहेत. अर्ध्या तासात विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत खरी लढत भाजपच्या प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यात होणार आहे.
पहिल्या पसंतीच्या 4 मतांची काँग्रेसची शिवसेनेकडे मागणी, शिवसेना 4 मते काँग्रेसला देणार, दुपारपर्यंत काही आमदारांचे मतदान शिल्लक ठेवून घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणार
सरकार आणि मुख्यमंत्री पद धोक्यात येऊ नये यासाठी शिवसेनेची काँग्रेसला सहकार्य करण्याची तयारी
पहाटेपर्यंत सुरू होती महाविकास आघाडीत खलबते
Vidhan Parishad Election LIVE : भाजप आमदारांची बस विधानभवनात पोहोचली, चंद्रकांत पाटलांसह अनेक आमदार विधानभवनात पोहोचले
तासाभरात विधान परिषद निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात, भाजपची पहिली बस विधान भवनाच्या दिशेनं रवाना
-------------------
पाचही उमेदवार जिंकून आणण्याचा भाजपला विश्वास, शिवसेना, राष्ट्रवादीचे आमदारही विधान परिषदेसाठी रवाना
----------------------
राष्ट्रवादीचे 3 आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नाहीत
----
अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते-पाटील, आशुतोष काळे कुठे आहेत?
---
तिघांची राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेलाही उशिरा पोहोचण्याची पुनरावृत्ती
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आज प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते.
Vidhan Parishad Election Live : आमदार क्षीतिज ठाकूर मुंबईत दाखल झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची तीन मते कोणाला मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Vidhan Parishad Election Live : सकाळी 9 वाजता विधान परिषद निवडणुकांसाठी मतदान सुरु होणार आहे.. आणि भाजप आमदारांना विधान भवनात पोहोचवण्यासाठी बसेस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे... भाजप आमदारांचा ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मुक्काम आहे..
Vidhan Parishad Election Live : राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोरदार संघर्ष आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मतांच्या गणिताचा पेपर अचूक सोडवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या निवडणुकीतही चमत्कार करणार का याची उत्सुकता आहे. की राज्यसभा निवडणुकीतून धडा घेऊन महाविकास आघाडीचे नेते आपलं कौशल्य पणाला लावून बाजी मारणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेप्रमाणे यावेळीही एकएक मत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी दोन्हीकडून जोरदार रस्सीखेच आहे. पण विधान परिषदेचं मतदान गुप्त असल्यानं कुणालाही दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे मत हे बहुमूल्य ठरले होते. आता विधानपरिषदेच्या आखाड्यात ही तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच आमदार जगताप मतदानासाठी मुंबईला जाणार आहेत.
Vidhan Parishad Election Live : वरळी इथल्या फोर सीझन्स हॉटेलबाहेर बस थांबली आहे. या बसमधून काँग्रेसच्या सर्व आमदारांना विधानभवनात मतदान करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. फोर सीझन्स हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Vidhan Parishad Election Live : वरळी इथल्या फोर सीझन्स हॉटेलबाहेर बस थांबली आहे. या बसमधून काँग्रेसच्या सर्व आमदारांना विधानभवनात मतदान करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. फोर सीझन्स हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
BJP आमदार मुक्ता टिळक विधानपरिषद मतदानासाठी मुंबईला निघाल्या,पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप थोड्याच वेळात मुंबईला रवाना होणार.
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये खरी लढत, कोण मारणार बाजी?
https://marathi.abplive.com/news/maharashtra/vidhan-parishad-election-2022-today-between-congress-bjp-political-marathi-news-1071393
भाजपच्या पक्षीय संख्याबळाचा विचार करता भाजपचे 4 उमेदवार कटाकटी निवडूण येतील. पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? कॉंग्रेसच्या भाई जगताप समोर भाजपनं तुल्यबळ उमेदवार प्रसाद लाड दिला आहे. अशावेळी भाजपची सर्व भिस्त आहे ती अपक्ष आमदार आणि मविआकडून फुटणाऱ्या मतांवर. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मात्र असं होणार नाही. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत. भाजप पुन्हा तांत्रिक डावपेच खेळून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार का याचं उत्तर आज मिळणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडत आहेत. या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार काय याची उत्सुकता दिसून येतेय.
पार्श्वभूमी
Maharashtra Vidhan Parishad Election Live 2022 : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार काय याची उत्सुकता दिसून येतेय.
महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती?
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे.
खरी लढत रंगणार भाजप विरूद्ध कॉग्रेस
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडत आहेत. या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
संख्याबळ नसताना भाजप कशी जिंकणार निवडणूक?
भाजपच्या पक्षीय संख्याबळाचा विचार करता भाजपचे 4 उमेदवार कटाकटी निवडूण येतील. पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? कॉंग्रेसच्या भाई जगताप समोर भाजपनं तुल्यबळ उमेदवार प्रसाद लाड दिला आहे. अशावेळी भाजपची सर्व भिस्त आहे ती अपक्ष आमदार आणि मविआकडून फुटणाऱ्या मतांवर. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मात्र असं होणार नाही. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत. भाजप पुन्हा तांत्रिक डावपेच खेळून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार का याचं उत्तर आज मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -