एक्स्प्लोर
महायुतीची मविआवर सरशी, काँग्रेसची 8 मतं फुटली, पाहा फायनल आकडेवारी!
Vidhan Parishad Election Result : 11 जागा असताना 12 वा उमेदवार मैदानात उतरवल्यानं विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला होता.
Maharashtra Vidhan Parishad Election Result : 11 जागा असताना 12 वा उमेदवार मैदानात उतरवल्यानं विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला होता. पण विधान परिषदेत (Vidhan Parishad Election) नववा उमेदवार जिंकून आणत महायुतीनं मविआला धक्का दिलाय. काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी काटेकोर रणनीती आखत विजय खेचून आणला.
महायुतीनं आपले सर्व 9 उमेदवार निवडून आणले. मविआचे दोन उमेदवार निवडून आले. तर शेकपच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. काँग्रेसची आठ मतं फुटली आहे. चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला धोबिपछाड दिलाय. भाजपचे पंकजा मुंडे, अमित गोरखे,परिणय फुके,योगेश टिळेकर हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच निवडून आले. सदाभाऊ खोतांनाही निवडून आणण्यात भाजपनं यश मिळवलं. एकनाथ शिंदेंचे शिवसेना कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन्ही शिलेदार सहज निवडून आले. अजित पवारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोघांनाही निवडून आणलं. दुसऱ्या उमेदवारासाठी मताचा कोटा कमी पडत असतानाही त्यांनी ही किमया करून दाखवली. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला...पण काँग्रेसचे आठ आमदार फुटल्यानं त्याचा फायदा महायुतीला झाला. मतांच्या फोडाफोडीवरून एकनाथ शिंदेंनी मविआला टोला लगावलाय. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधान परिषदेत मविआला धोबिपछाड देत महायुतीनं काढलाय. पण खरी लढाई विधानसभेची आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचाही विजय झाला. शेकपच्या जयंत पाटलांना पराभवाचा धक्का बसला आहे.
विधान परिषद निकालाची वैशिष्ट्य पाहूयात...
- महायुतीचे हीरो देवेंद्र फडणवीसच
- दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीसांचा राजकीय वरचष्मा दिसला.
- काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली.
- उद्धव ठाकरेंना शिंदेंचं एकही मत फोडता आलं नाही.
- शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही.
- पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं.
- अमित गोरखेंच्या रुपानं मातंग समाजातील तरुण चेहरा विधानपरिषदेत
- योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व
- सदाभाऊ खोत यांच्या रुपानं शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता पुन्हा आमदार झाले.
कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली ?
भाजप
पंकजा मुंडे- 26
परिणय फुके-26
अमित गोरखे- 26
सदाभाऊ खोत- 23
योगेश टिळेकर- 26
अजित पवार राष्ट्रवादी
शिवाजीराव गर्जे - 24
राजेश विटेकर – 23
शिवसेना- (शिंदे)
भावना गवळी - 24
कृपाल तुमाने - 25
शिवसेना (उद्धव ठाकरे)
मिलिंद नार्वेकर - 24
जयंत पाटील, शेकप - 12
काँग्रेस
प्रज्ञा सातव- 25
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement