एक्स्प्लोर

ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या

नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

मुंबई : महायुतीकडून आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महावकास आघाडीतील राजकीय पक्षांकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू केलं आहे. शिवसेना युबीटी पक्षाने माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे. त्यामुळेच, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर, आज तब्बल 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह, वसंत गितेंनाही ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म देण्यात आले आहेत. नाशिक पश्चिम मधून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात माजी आमदार वसंत गीते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. तर, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात दादा भुसे यांना आव्हान देणार शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने उमेदवारीवर दावा केला होात, हेमलता पाटील काँगेसकडून येथे इच्छुक होत्या. मात्र, ही जागा शिवसेनेला मिळाल्याची माहिती आहे.  

नांदगावमधून गणेश धात्रक

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांना शिवसेनेची (ठाकरे गट) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या ठाकरे गटाकडून उमेदवारीच्या आशा मावळल्या आहेत. नांदगाव मतदारसंघात आता शिवसेना शिंदे व ठाकरे गटात लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. धात्रक हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व मनमाड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. ठाकरे गटाची उमेदवारी गणेश धात्रक यांना जाहीर झाल्याने मतदारसंघात शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून आज कोणी कोणी एबी फॉर्म घेतले

सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)

२)वसंत गिते(नाशिक मध्य) 

३ )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य) 

४)एकनाथ पवार (लोहा कंधार)

५ )के पी पाटील, राधानगरी विधानसभा

६ )बाळ माने, रत्नागिरी विधानसभा

७) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा

८ )अमर पाटील, सोलापूर दक्षिण

 ९) गणेश धात्रक, नांदगाव

 १०)दीपक आबा साळुंखे पाटील,  सांगोला

११) प्रविणा मोरजकर, कुर्ला 

१२) एम के मढवी, ऐरोली 

१३) भास्कर जाधव, गुहागर 

 १४)वैभव नाईक, कुडाळ

 १५) राजन साळवी, राजापूर लांजा 

 १६) आदित्य ठाकरे, वरळी 

 १७) संजय पोतनीस, कलिना 

१८) सुनील प्रभू, दिंडोशी 

१९) राजन विचारे, ठाणे शहर 

२०) दीपेश म्हात्रे, डोंबिवली 

२१) कैलास पाटील, धाराशिव 

२२) मनोहर भोईर, उरण 

२३) महेश सावंत, माहीम 

२४)श्रद्धा जाधव, वडाळा 

२५) पाचोरा - वैशाली सूर्यवंशी  

२६) नितीन देशमुख  - बाळापूर 

२७)  किशनचंद तनवाणी - छत्रपती संभाजी नगर मध्ये 

 २८)छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे*

 २९)वैजापूर मतदारसंघ  - दिनेश परदेशी*

 ३०) कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत*

 ३१) सिल्लोड  मतदारसंघ - सुरेश बनकर

३२) राहुल पाटील - परभणी 

३३) शंकरराव गडाख -नेवासा 

३४) सुभाष भोईर  - कल्याण ग्रामीण 

३५) सुनील राऊत - विक्रोळी

३६) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम 

३७) उन्मेश पाटील - चाळीसगाव 

३८) स्नेहल जगताप - महाड 

३९) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व  

४०) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी

हेही वाचा

उद्धव ठाकरेंनी नातं जपलं नाही, अमित ठाकरेंविरुद्ध उमेदवार दिल्याने आमदाराने करुन दिली आठवण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 12 March 2024ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 8PM 12 March 2025Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Embed widget