एक्स्प्लोर

Maharashtra MLC Election : पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

harashtra MLC Election : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे.

Maharashtra MLC Election : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या (Konkan Teacher Constituency Election) निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील (Balaram Patil) विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत 20648 मते

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैध ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

हा शिक्षकांचा विजय, पेंशनचा प्रश्न सोडवणार : ज्ञानेश्वर म्हात्रे

ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता तो विश्वास आज सफळ झाला आहे. रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे हा विजय सुकर झाला. हा शिक्षकांचा, 33 संघटनांचा विजय आहे. मला 20 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे. जो कोटा गरजेचा होता तो पहिल्याच फेरीत पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर दिली. "आझाद मैदानावर आंदोलनं करुन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन अनुदानाचा प्रश्न सोडवला होता. आता पेंशनचा प्रश्न सोडवायचा आहे," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. "हा शिक्षकांनी घेतलेला बदला आआहे. कारण सहा वर्ष शिक्षकांची कामं झाली नव्हती, असा त्यांचा आरोप होता. त्याउलट साडेआठ हजार शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, संस्थांची कामं मी स्वत: वेळ देऊन केली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या विजयात असेल. बाळाराम पाटील यांनी पराभवी स्वीकारुन माझं अभिनंदन केलं यासाठी त्यांचे आभार," असंही ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.

कोकणातील शिक्षकांनी दिलेला कौल मान्य, पराभूत स्वीकारतो : बाळाराम पाटील

"निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार व्यक्त करतो. विजयी उमेदवाराचे अभिनंदन करते आणि कोकणच्या शिक्षकांनी दिलेल्या कौल मी खुल्या मनाने स्वीकार करतो. निकाल माझ्या दृष्टीने अनपेक्षित आहे. अश पद्धतीचं वातावरण नव्हतं पण निकाल आलाय तो मान्य करतो. पैशांचा वापर झाला आहे, पण जो कौल कोकणच्या शिक्षकांनी दिला आहे भले तो कोणत्याही कारणाने दिला असेल तो मी दिलखुलासपणे स्वीकारत आणि पराभव मान्य करतो," अशी प्रतिक्रिया शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी निकालानंतर दिली. 

पाच जिल्ह्यातील शिक्षकांचं मतदान

दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॅा महेंद्र कल्याणकर हे काम पाहत होते. 28 टेबलवर मतमोजणी झाली. पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी या निवडणुकीत 91 टक्क्यांपर्यंत मतदान केलं होतं. 

VIDEO : Konkan Teachers Election Result मविआचे Balaram Patil पराभूत, BJP चे Dnyaneshwar Mhatre यांचा विजय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget