Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

Gram Panchayat Election Live Updates: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये  निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून, प्रचाराचा धुरळा उडलाय. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Dec 2022 12:50 PM
Baramati Gram Panchayat Election:  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी थेट दुबईहून बारामतीमध्ये

Baramati Gram Panchayat Election:  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दामपत्य 80 हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबईमध्ये विमानतळावर कामाला आहेत. ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजू कडील विमान प्रवासासाठी तब्बल 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. 

Baramati Gram Panchayat Election:  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासा थेट दुबईहून मतदानासाठी बारामती मध्ये

Baramati Gram Panchayat Election:  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दामपत्य 80 हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबईमध्ये विमानतळावर कामाला आहेत. ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजू कडील विमान प्रवासासाठी तब्बल 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. 

Beed Gram Panchayat Election: मतदान अधिकाऱ्यानेच दबाव टाकून मतदान करून घेतल्याचा सरपंच पदाच्या उमेदवाराचा आरोप

Beed Gram Panchayat Election: बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील साळेगाव येथे मतदान सुरू असताना मतदान अधिकाऱ्यानेच मतदारांवर दबाव टाकून मतदान करून घेतल्याचा आरोप सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रय इंगळे यांनी केला आहे त्यामुळे त्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन बूथ क्रमांक एकमध्ये फेर मतदान घेण्याची मागणी  केली आहे. साळेगाव येथील बुथ क्रमांक एकमध्ये असलेल्या मतदान अधिकाऱ्यांनी मतदारांच्या इच्छेविरुद्ध स्वतः मतदान केल्याचे फोटो त्यांनी तहसीलदार यांना पाठवले असून मतदारांना आपल्या इच्छेनुसार मतदान करता आलं नाही असं देखील तक्रार इंगळे यांनी केली आहे 

 Nashik Gram Panchayat Election: नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीसाठी एकूण 79.63 टक्के मतदान

 Nashik Gram Panchayat Election:  नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून एकूण 79.63 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.  जिल्ह्यात सुरगाणा वगळता 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. यातील 08 ग्रामपंचायत बिनविरोध ठरल्या होत्या. 


बिनविरोध आठ ग्रामपंचायती खालीलप्रमाणे


बागलाण तालुका - किकवारी बु, ढोलबारे महड.. नाशिक तालुका, कोटमगाव.. चांदवड तालुका - नारायणगाव.. कळवण तालुका - जयपूर.. नांदगाव तालुका - शास्त्रीनगर.. दिंडोरी - जालखेड. 


मंगळवारी मतमोजणी होणार असून सर्वच उमेदवारांची आता धाकधूक वाढलीय. 

Beed Gram Panchayat Election: राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीवरून हाणामारी

Beed Gram Panchayat Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागले आहे.  परवा दिवशी जुन्या वादातून दोन गटात मारामारी झाली.  सचिन आजबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिराळमधल्या चौकामध्ये संग्राम आजबे महेश आवे आणि आमदार बाळासाहेब आजबे यांचे पुत्र यश यांच्यासह 50 जणांनी मारहाणी केल्याचा आरोप आहे. बाळासाहेब आजबे गटाकडून सुद्धा सचिन आजबे च्या विरोधात मारहाणीच्या तक्रार दिली आहे त्यानुसार सचिन आजबे ज्ञानेश्वर आजबे यांच्यासह 32 जनावर गुन्हे दाखल झाले आहेत 

Maharashtra Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.79 टक्के मतदान झालं

Maharashtra Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.79 टक्के मतदान झालं.

Maharashtra Gram Panchayat Election : सोलापूर जिल्ह्यात 81.19 टक्के इतके मतदान

Maharashtra Gram Panchayat Election :  सोलापूर जिल्ह्यात 81.19 टक्के इतके मतदान

Maharashtra Gram Panchayat Election : पालघर जिल्ह्यात 78.63 टक्के मतदान

पालघर - पालघर जिल्ह्यातील एकूण 63 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं ,. संध्याकाळी 5.30  मतदान प्रक्रिया पडली असून मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला  मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर झाली असून जिल्ह्यात 78.63 टक्के मतदान झाले आहे.  20 डिसेंबर ला मतदानाची  मतमोजणी होणार आहे . 63 पैकी 32 ग्रामपंचायती ह्या पालघर तालुक्यातील असून वाडा आणि वसई तालुक्यात प्रत्येकी 15 तर तलासरी तालुक्यात एका ग्रामपंचायत साठी मतदान  पार पडलं आहे . यापैकी पालघर मधील नावझे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली.

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates:  राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135  ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी  मतमोजणी होईल.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाम्पत्य दुबईहून थेट बारामती तालुक्यातील गडदरवाडीला





Gram Panchayat Election :  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दांपत्य 80 हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबईमध्ये विमानतळावर कामाला आहेत.  ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाज कडील विमान प्रवासासाठी तब्बल 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. मतदान करून वेगळे समाधान भेटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


 

 



 


Gram Panchayat Election : भंडारा जिल्ह्यातील 303 ग्रामपंचायतींची निवडणूक शांततेत पार , दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील 303 ग्रामपंचायतची निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पडली. 1049 मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडली. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के झाले होते. मतदान प्रक्रिया सायंकाळी 5.30 वाजता संपली. अंतिम आकडेवारी येण्यास उशीर असल्याने भंडारा जिल्ह्यात साधारणतः 80 टक्के पर्यंत मतदान होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Gram Panchayat Election  : धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 % मतदान

Gram Panchayat Election  : धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 % मतदान


 

Akola Gram Panchayat Election  अकोला : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान.

Akola Gram Panchayat Election  अकोला : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान. जिल्ह्यात होत आहे 266 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक.

Gram Panchayat Election :वाशिम जिल्ह्यातील 287 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 3.30 वाजेपर्यंत 58.99 टक्केवारी

Gram Panchayat Election : वाशिम जिल्ह्यातील 287 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 3.30 वाजेपर्यंत 58.99 टक्केवारी

Sindhudurg Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08टक्के मतदान

Sindhudurg Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08टक्के मतदान

Wardha Gram Panchayat Election : वर्धा जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17%मतदान झालंय


वर्धा जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मतदान सुरुय आणि दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17%मतदान झालंय

Gram Panchayat Election : जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 

Gram Panchayat Election :  जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 

Gram Panchayat Election : यवतमाळ  जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान

यवतमाळ :  जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान. जिल्ह्यात होत आहेय 93 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

Gram Panchayat Election : दुपारी  3:30 वाजेपर्यंत अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी

अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी : अहमदनगर जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतीसाठी दुपारी  3:30 वाजेपर्यंत 69.42 टक्के मतदान झालं आहे...

 Beed Gram Panchayat Election : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील टोकवाडी गावात गोंधळाची परिस्थिती
Beed Gram Panchayat Election :  बोगस मतदान होत असल्याचा दावा करत उमेदवारांनी घातला गोंधळ. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील टोकवाडी येथील प्रकार, टोकावडी गावात गोंधळाची परिस्थिती, मतदार यादीमध्ये नाव नसतानाही व्यक्ती मतदान केंद्रामध्ये दाखल झाल्याने उडाली खळबळ. यादीमध्ये नाव नसतानाही मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला गावकऱ्यांनी काढलं बाहेर

 

टोकवाडी मध्ये काही वेळ तणावाचे  वातावरण

 

प्रभाग क्रमांक 5 मध्ये बोगस मतदान होत असल्याने उमेदवार प्रतिनिधींनी घेतला आक्षेप..

 

 
Beed Gram Panchayat Election : बीडमध्ये लिंबागणेश गावात फेवीक्विक टाकलेली ईव्हीएम मशीन बदलण्यात आली






Beed Gram Panchayat Election : बीडमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच लिंबागणेश गावात सरपंचपदाचे उमेदवार असलेल्या गणेश वाणी यांच्या चिन्हासमोरील बटनावर अज्ञात व्यक्तींने फेविक्विक टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.  याप्रकरणी गणेश वाणी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर या मतदान बूथवरची मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती आणि आता फेवीक्विक टाकलेली ईव्हीएम मशीन बदलण्यात आली आहे.. पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे



 

 



 


Gram Panchayat Election : भंडाऱ्याच्या कुंभलीत निवडणुकीदरम्यान दोन गटात तुफान राडा

Gram Panchayat Election : राज्यातील तब्बल साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळीच मतदानला सुरवात झाली आहे. तर या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुळ गाव असलेल्या सुकळीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली या गावात दोन गटामध्ये तुफान राडा झाला असल्याचे समोर आले आहे. कुंभली या गावात मतदान प्रक्रिया पार पडत असताना दोन गटात तुफान हाणामारी झाली. एका विशिष्ट गटाच्या उमेदवाराला मतदान केंद्र परीसराच्या आतमध्ये तर दुसऱ्या गटाच्या उमेदवाराला बाहेर ठेवल्यामुळे हा वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील कुंभली येथे ही घटना घडली.

Nashik Gram panchayat Election : नाशिक ग्रामपंचायत निवडणूक : दीड वाजेपर्यंत 50.72 टक्के मतदान

Nashik Gram panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील 196 पैकी 188 ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदान सुरु आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात सकाळी साडेसात ते दुपारी दिड पर्यंत 50.72 टक्के मतदान झाले आहे. 

Kolhapur News: कोल्हापूर: करवीर तालुक्यातील नेर्ली येथे मतदान यंत्रात बिघाड, खोळंबा झाल्याने मतदारांच्या रांगा

Kolhapur News: कोल्हापूर:  करवीर तालुक्यातील नेर्ली येथे मतदान यंत्रात बिघाड


मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ गोंधळ 


मतदान केंद्रांवर लांबच लांब मतदारांच्या रांगा 


मतदान यंत्रात बिघाड झाल्याने अनेक जण मतदानासाठी खोळंबले


तब्बल तासभरापसून मशीन बंद पडल्याने मतदार ताटकळले

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात सन्नाटा! ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंयतींसाठी मतदान सुरु असतानाच शाहूवाडी तालुक्यात मात्र, पूर्णत: सन्नाटा आहे. ग्रामस्थांनी शाहूवाडीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शाहूवाडीतील मतदान केंद्रे मतदारांअभावी ओस पडली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहूवाडी ग्रामस्थांचा विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानतंर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे चुरशीना मतदान होत असताना शाहूवाडी मात्र शुकशुकाट आहे. 

Gram Panchayat Election: औरंगाबादमध्ये साडेअकरा वाजेपर्यंत 13.52% मतदान

Gram Panchayat Election:  औरंगाबाद जिल्ह्यात 216 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत असून, मतदारांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादमध्ये साडेअकरा वाजेपर्यंत 13.52% मतदान झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

Beed News: मतदानासाठी बीडकडे येणाऱ्या दांपत्याच्या गाडीला भीषण अपघात तिघेजण गंभीर जखमी

Beed News: पुण्याहून बीडकडे ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या गाडीला बीड केज रोडवर भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याला वास्तव्याला असलेले बरळकर कुटुंबीय ग्रामपंचायतच्या मतदानासाठी केज तालुक्यातल्या सावला गावी येत असताना केस जवळ असलेल्या पिंपळगाव फाट्याजवळ त्यांच्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह सतीश परळकर आणि सुभिद्रा परळकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील 93 ग्रामपंचायतींसाठी 308 मतदान केंद्रावर मतदान सुरू, मतदारांचा प्रतिसाद

Yavatmal News: जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतसाठी 308 मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे.  जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायत पैकी 5 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध झाल्या आहेत तर 1 ठिकाणी बहिष्कार आहे आणि एका ग्रामपंचायत मध्ये फक्त सदस्यसाठी मतदान आहे. या उर्वरित  93 ग्रामपंचायतीपैकी 611 उमेदवारांच्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत असून 1410 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर 93 सरपंच पदासाठी 293 उमेदवार आहेत. 

Gram Panchayat Election : भाजपचे बावनकुळे, कॉंग्रेसचे केदार अन् राष्ट्रवादीच्या देशमुखांची प्रतिष्ठा पणाला

Nagpur Gram Panchayat Election Update : ग्रामपंचायत निवडणूक जरी गावपातळीवरची असली तरी अनेक राज्यस्तरीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पूर्वीच्या कामठी- मौदा मतदार संघात तब्बल 52 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत आहे. तर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या सावनेर - कळमेश्वर या मतदारसंघात 59 ग्रामपंचायत मध्ये आज मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल नरखेड मतदार संघातील 49 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असल्याने या तिन्ही दिग्दजांची प्रतिष्ठा आजच्या निवडणुकीत पणाला लागली आहे.

Gram Panchayat Election : जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतींसाठी मतदान ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Nagpur Gram Panchayat Election Update : ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज पहाटेपासून सुरुवात झाली असून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील रायपूर गावात मोठ्या संख्येने ग्रामीण मतदार मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. महिलांची संख्या लक्षणीय असून लोक थंडी असतानाही मोठ्या संख्येने सकाळपासून मतदान केंद्रावर येत आहेत. नागपूर जिल्ह्यात 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होत असून पाच ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाल्याने आज 231 ठिकाणी मतदान होत आहे. सरपंच पदासाठी 761 उमेदवार मैदानात असून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 4 हजार 891 उमेदवार रिंगणात आहेत. 

Raigad News: महाड तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, शिंदे गट आणि महाविकास आघाडीत चुरस

Raigad News: महाड तालुक्यात 73 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायती बिनविरोध असून उर्वरित 47 ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आज मतदान होत आहे. महाड तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरसीची लढत असल्याने महाड तालुक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Beed News: बीड: ग्रामपंचायत मतदानावर थंडीचा परिणाम; सुरुवातीच्या दोन तासात मतदानाला अल्प प्रतिसाद

Beed News: आज होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायत या बीड जिल्ह्यातील आहेत. मात्र, बीडमध्ये थंडीचा जोर मागच्या दोन दिवसापासून वाढल्यामुळे सकाळी मतदार घराबाहेर पडले नाहीत आणि त्यामुळे पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाला अल्प प्रतिसाद दिसून आला. 

Parbhani News: परभणी जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात

Parbhani News:  परभणी जिल्ह्यातील एकुण 127 ग्रामपंचायतीसाठी यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी 8 ठिकाणी सरपंचांसह पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून 2 ठिकाणी केवळ सरपंच बिनविरोध झाले असल्याने उर्वरित 119 ग्रामपंचायतसाठी मतदान होत आहे. त्यातील 117 सरपंच तर 1081 ग्राम पंचायत सदस्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. 

Pune News: बारामती तालुक्यात 13 दौंड तालुक्यात 8 आणि इंदापूर तालुक्यात 26 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर आणि दौंड तालुक्यातही सकाळपासूनच शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. बारामती तालुक्यात 13 दौंड तालुक्यात 8 आणि इंदापूर तालुक्यात 26 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती तालुक्यामधील तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणावर सकाळपासून मतदारांनी रांगा लावत आपले कर्तव्य बजावत आहेत. बारामती तालुक्यातील 66 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत असून पोलीस प्रशासनाच्या वतीने  कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सांगली : जत तालुक्यातील वाळेखिंडी ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्ह पुसट दिसत असल्याने गोंधळ 

सांगली : जत तालुक्यातील वाळेखिंडी ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्ह पुसट दिसत असल्याने कालपासून गोंधळ आहे.   चिन्ह पुसट दिसत असल्याने ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याने तेथील मतदान प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे. जतचे तहसीलदार जीवन बनसोडे गावी जाऊन नेमका काय प्रकार झाला आहे याची माहिती घेण्यासाठी वाळेखिंडी गावात पोहोचत आहेत. कपाशी, ट्रॅक्टर, शिट्टी, छत्री शिलाई, मशीन, छताचा पंखा हे चिन्ह नीट दिसत नसल्याने ग्रामस्थ व उमेदवारांनी मतदान बंद ठेवले.

Sangli : आमदार गोपीचंद पडळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क, पडळकरांच्या आई सरपंचपदाच्या रिंगणात

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आई हिराबाई पडळकर या सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Vasai Election: वसई तालुक्यात 15 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरु

Vasai News: वसई तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 141 सदस्य आणि 15 सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी 16 जण बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत.  एका जागेवर उमेदवारी अर्जचं न आल्याने 124 सदस्य जागांसाठी आज मतदान होत  आहे. आज 55 मतदान केंद्रावर सकाळी साढे सात वाजल्यापासू मतदारांनी रांग लावून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.   385 महसूल कर्मचारी अधिकारी आजच्या मतदानात प्रक्रियेत  काम करत आहेत.

Osmanabad News: उस्मानाबाद जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतसाठी मतदान सुरू

Osmanabad News: उस्मानाबाद जिल्ह्यातील 658 मतदान केंदावर 3 लाख 65 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील 39 मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकसाठी 2 हजार 752 कर्मचारी व 37 झोनल अधिकारी काम करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच पदाच्या 162 जागांसाठी 888 उमेदवार तर सदस्य पदाच्या एक हजार 435 जागांसाठी चार हजार 960 उमेदवार रिंगणात आहेत.

Beed News: निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर; वडवणीत 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Beed News: ग्रामपंचायत निवडणुकीत वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील ६ कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनीB नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केला. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल.

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी

Kolhapur Gram Panchayat Election 2022 Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे.  उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत. 

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates : विविध जिल्ह्यांत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या

Gram Panchayat Election 2022 Live Updates : अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates : एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतींची निवडणूक

Gram Panchayat Election 2022 Live Updates : एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून आज त्या त्या गावात पोलिंग पार्टी रवाना होतील. विदर्भामध्ये दोन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात 236 तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात 305 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. सोबतंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गावामध्येसुद्धा निवडणूक होत आहे. या व्यतिरिक्त विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ज्यात सुनील केदार, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, मंत्री संजय राठोड यांच्या सारखे सारखे दिगग्ज नेत्यांचा समावेश आहे.

Gram Panchayat Election 2022 Live Updates : ग्रामपंचायतींसाठी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात

Gram Panchayat Election 2022 Live Updates : आज 7751 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.

Gram Panchayat Election 2022 Live Updates : मेंगडेवाडीचे मतदान केंद्र अचानक चऱ्हाटा येथे हलविले, ग्रामस्थांचं रात्रीच तहसिलसमोर ठाण

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates : बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडे वस्ती येथील मतदान बूथ प्रत्येक वेळी मेंगडेवाडीच येथेच असते. मात्र यावेळी प्रशासनाने अचानक तेथील बूथ चऱ्हाटा येथे हलविल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. रात्री उशिरा ग्रामस्थांनी बीड तहसिलसमोर ठाण मांडले होते. बीड तालुक्यातील मेंगडेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्र अचानक तेथील केंद्र चऱ्हाटा येथे हलविण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी बीड तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडले असून मेंगडेवाडी येथेच बूथ ठेवा अशी मागणी होते.

Sindhudurg Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायती बिनविरोध, 293 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

Sindhudurg Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 293 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर  प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गट युतीने त्या प्रतिष्ठेच्या केल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून त्यासाठी 929 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. 1 हजार 64 मतदान यंत्रेही सज्ज असून एकूण 4 लाख 9 हजार 936 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्यानेही बंदोबस्ताची चोख तयारी केली आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी सर्वच पक्षांकडून ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या आहेत. 

बारामतीतील प्रशासकीय भवनमधून 396 कर्मचारी 13 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रवाना

राज्यात उद्या 7000 हून अधिक ग्रामपंचायतींचे मतदान होत आहे. या ग्रामपंचायतीच्या मतदानाची तयारी आज प्रशासनाने सुरू केली आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनमधून 396 कर्मचारी 13 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पेट्या घेऊन निवडणूक अधिकारी रवाना झालेत. बारामतीत 66 मतदान केंद्र  उभारण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर आजच निवडणूक अधिकारी पोहोचणार आहेत. 


 
भंडारा जिल्ह्यातील 303 तर गोंदिया जिल्ह्यातील 345 ग्रामपंचायतची निवडणूक उद्या पार पडणार
Bhandra Gram Panchayat Election : भंडारा जिल्ह्यातील 303 आणि गोंदिया जिल्ह्यातील 345 ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक उद्या 18 डिसेंबरला पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून मतदान पथक तयार झाले आहे. पोलिंग पार्टीला मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहनांची व्यवस्था केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव हे तीन तालुके अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

 
जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

Jalgaon Gram Panchayat Election :  जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीसाठी उद्या (18 डिसेंबर) रोजी मतदान होत आहे. यात 140 पैकी 18 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. यात जळगाव तालुक्यातील सुजदे, सावखेडा, जामनेर तालुक्यातील किनगाव, अमळनेर तालुक्यातील निमझरी, अंतूर्ली रंजाने, बामणे, चोपडाई, चाळीसगाव तालुक्यातील डांमरून, अंधारी, रावेर तालुक्यातील अटवाडे, धुरखेडा, सिंगत, दोधे, तर पारोळा तालुक्यातील कराडी, सावखेडे होळ, सावखेडे मराट,  राजवड तसेच एरंडोल तालुक्यातील जवखेडे सीम या 18 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.  408 सदस्य हे देखील बिनविरोध झाले आहेत. 

धुळे जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार

Dhule Gram Panchayat Election :  धुळे जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायत साठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. काल सायंकाळी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर विविध पक्षाच्या समर्थकांकडून छुप्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतची मुदत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये संपल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीच्यावेळी धुळे तालुक्यातील तीन, साक्रीतील पाच तसेच शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक एक एक अशा दहा ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण 14 ठिकाणचे सरपंच 400 हून अधिक सदस्य बिनविरोध झाले आहेत. यामुळं 118 ग्रामपंचायतीसाठी आता मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

धुळे: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना होणार निवडणूक साहित्यांचे वाटप

Dhule News: धुळे जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायत साठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून या मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे काल सायंकाळी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर विविध पक्षाच्या समर्थकांकडून छुप्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतची मुदत सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये संपल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीच्या वेळी धुळे तालुक्यातील तीन, साक्रीतील पाच तसेच शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक एक एक अशा दहा ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाले आहेत तसेच जिल्ह्यात एकूण 14 ठिकाणचे सरपंच 400 हून अधिक सदस्य बिनविरोध झाले आहेत यामुळे 118 ग्रामपंचायतीसाठी आता मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील 190 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Ahmednagar Gram Panchayat Election :  अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींची निवडणूक लागल्यानंतर यातील पंधरा सरपंच पद आणि 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराचा तोफा आता थंडावल्या असून, प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 190 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होईल. अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता अहमदनगर जिल्ह्यात अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या ग्रामपंचायत निवडणुकीत पणाला लागली आहे. आजी-माजी महसूलमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजपचे राम शिंदे या नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


 

कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध (Kolhapur Gram Panchayat Election) 

कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर करवीर आणि हातकणंगले तालुक्यात जोरदार हालचाली झाल्या आहेत. चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील सहा ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकलाय.  सरपंच पदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 601 उमेदवार रिंगणात आहेत.


 

बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती बिनविरोध (Beed Parli Gram Panchayat Election) 

 


बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रा.पं.साठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर  ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत.  जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे  गोपीनाथ गड असलेली परळी तालुक्यातल्या पांगरी गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. या ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 10 जागा धनंजय मुंडे यांनी बिनविरोध आपल्या ताब्यात घेतल्या असून सुशीला कराड यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. बिनविरोध ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला.  




 


रायगडमध्ये 50 ग्रामपंचायती बिनविरोध (Raigad Gram Panchayat Election)

 


रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये महाडमधील 22, श्रीवर्धन 09, म्हसळा 07 आणि श्रीवर्धन येथील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता जिल्ह्यात सरपंच पदासाठी 531 तर सदस्यपदासाठी 3238 उमेदवार रिंगणात आहेत. रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीसाठी आता निवडणुका होणार आहेत. 

Beed Gram Panchayat Update: नाथऱ्यात पंकजा मुंडे समर्थक आणि धनंजय मुंडे समर्थक एकत्रित

मुंडे कुटुंबियाचं मूळ गाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आठ सदस्य बिनविरोध निघाल्यात विशेष म्हणजे पहिल्यांदाच या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे समर्थक आणि धनंजय मुंडे समर्थक एकत्रित येऊन ही निवडणूक लढताना पाहायला मिळत आहेत. 18 तारखेला नाथरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आणि एक सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे

बाभूळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत उद्वव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी एकत्र
राज्याच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची चर्चा सुरूये. मात्र, या प्रस्तावित 'शिवशक्ती-भिमशक्ती'चा प्रयोग होतोये प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात. अकोला शहरालगतच्या बाभूळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पक्ष युती करून लढतायेत.  अकोला जिल्ह्यात 18 डिसेंबरला 266 ग्रामपंचायतींची निवडणुक होत आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा होतेय ती शहरालगतच्या बाभूळगाव ग्रामपंचायत निवडणुकीची. याला कारण आहे या गावाच्या निवडणुकीत उद्वव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहूजन आघाडी सोबत लढतायेत. वंचितचे सरपंच पदाचे उमेदवार प्रशांत सिरसाट आणि सदस्यांना विजयी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जीवाचं रान करतायेत. जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींमध्ये हे पक्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करतायेत.  अकोला जिल्हा हा प्रकाश आंबेडकरांचा राजकीय गड समजला जातोय. त्यामूळे बाभूळगावची ग्रामपंचायत निवडणुक 'शिवशक्ती-भिमशक्ती' मैत्रीची 'लिटमस टेस्ट' समजली जातेय. 
Malkapur Gram Panchayat Election : माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची मलकापूर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला.

Malkapur Gram Panchayat Election : उदगीर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे गाव मलकापूर आहे. येथे ग्रामपंचायत निवडणूक रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलच्या कार्यकर्तेच पॅनल आहे ..सरपंच पदाचे उमेदवार हे गुरुनाथ बिरादार आहेत.. तसेच गावातील भाजपाचे कार्यकर्ते ही त्यांच्या बाजूने आहेत. मात्र, विरोधात काँग्रेस पार्टीचे सिद्धेश्वर ऊर्फ मून्ना पाटील उभे आहेत. मागील 35 वर्षांपासून ग्रामपंचायत मुन्ना पाटील यांच्या ताब्यात आहे. ते तालुक्यातील काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते आहेत. बाजार समितीचे सभापतीही होते. गावातील राजकारणापासून कायम लांब राहणारे संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या गटातील कार्यकर्त्यांना यावेळी बळ दिले आहे. साथीला भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आघाडी घेतली आहे. 35 वर्षांची सत्ता काँग्रेसकडून खेचून आणण्यात त्यांना यावेळी यश येते का ह्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

13 + 1  अशी ग्रामपंचायतीची रचना आहे

भंडाऱ्यातील तीन गावांची गट ग्रामपंचायत बिनविरोध, शेळीपालन करणारी महिला सरपंचपदी

Bhandra Gram Panchayat Election : भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यातील विहीरगाव -टेंभरी-आवळी या तीन गावांनी मिळून एक गट ग्रामपंचायत आहे. पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तिन्ही गावातील ग्रामस्थ एकत्र आले. सर्वांनी मिळून आरक्षण पद्धतीने सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्याचा ठराव पारित केला आहे. विशेष म्हणजे ही निवड प्रक्रिया सर्वांच्या संमतीने पार पाडत असताना ग्रामस्थांनी जे प्रस्थापित राजकारणी आहेत, त्यांना यातून दूर ठेवले. निवड करताना ज्या लोकांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नाही किंबहुना भविष्यातही त्यांना राजकीय पद उपभोगता येणार नाही, अशांचीच ग्रामस्थांनी निवड केली आहे. शेतीसह शेळीपालन करणारी आवळी येथील अशा मेश्राम यांची सरपंचपदी निवड केली तर, मोलमजुरी करून कुटुंबाचं उदरनिर्वाह करणाऱ्या प्रामाणिक महिला आणि पुरुषांची सर्व ग्रामस्थांनी सदस्य म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे यातील दोन सदस्य हे भूमीहीन असून उर्वरित अल्पभूधारक आहेत. गावाच्या विकासासाठी येणाऱ्या निधीत कुठलाही अपहार होऊ नये किंबहुना गावाचा विकास करता यावा या दृष्टीने या ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार भंडारा जिल्ह्यासाठी गौरवाचा ठरला.

Bhandara Gram Panchayat Election: ताडगावात निवडणुकीवरुण दोन गटात वाद; 9 आरोपींना अटक

Bhandara Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर निवडणूकी वरुण दोन गटात वाद झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी तालुक्यातील ताडगावात घडली आहे. या प्रकरणी मोरगांव अर्जुनी पोलिसांनी वेळीच दखल घेत तनाव शांत करत 9 आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून गावात तनावपूर्ण शांतता आहे.

माढा तालुक्यात एक सरपंच बिनविरोध तर सात ग्रामपंचायतीसाठी होणार निवडणूक

Madha Taluka Gram Panchayat Election :  माढा हा राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. बहुतांश ठिकाणी शिंदे यांच्या दोन गटातच लढत होत आहे. भोसरे इथे मात्र ठाकरे गटाची सत्ता असून यंदाही ठाकरे गट विरुद्ध अपक्ष आमदार संजयामामा शिंदे यांच्या गटात लढत होत आहे. तर घाटणे इथे शेतकरी संघटनेचे संजय घाटणेकर विरुद्ध आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात लढत होत आहे. माढा तालुक्यात निवडणूक लागलेल्या आठ ग्रामपंचायतीपैकी एक सरपंच बिनविरोध झाला आहे. तर सात ठिकाणी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाची शिंगेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

सांगोला तालुक्यात दोन ठिकाणी बिनविरोध सरपंच तर चार ठिकाणी निवडणूक

Sangola Gram Panchayat Election : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात सहा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली आहे. यातील दोन ठिकाणी बिनविरोध सरपंच निवडले आहेत. तर चार ठिकाणी निवडणूक होणार आहे. सांगोला तालुक्यात प्रमुख लढत ही डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांच्या आघाडीत होत आहे. 


 

लग्नानंतरही मैत्री जोपासणाऱ्या दोन मैत्रिणी ग्रामपंचायत निवडणुकीत आमने-सामने

Bhanadar Gram Panchayat Election :  महाविद्यालयीन जीवनापासून सुरू असलेली मैत्री लग्नानंतरही जोपासणाऱ्या दोन मैत्रिणी ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र, एकमेकींविरुद्ध निवडणूक लढत आहेत. पल्लवी आणि रश्मी यांची महाविद्यालयीन जीवनापासून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून मैत्री सुरू झाली होती. दोघींनीही एकत्र शिक्षण घेतले. कालांतराने दोघींचे विवाह पार पडले. यातही दोघींची मैत्री दुरावली नाही. पल्लवी आणि रश्मी या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावातील तरुणांशी विवाह बंधनात अडकल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील माहेर असलेल्या दोन्ही मैत्रीनींचं सासर भंडारा जिल्ह्यातील एकाच गावातील असल्याने मैत्री दुरावली नाही. दोघींच्या विवाहात एक मजेशीर आणि योगायोग जुळून आला. तो म्हणजे पती आणि त्यांचे सासर. पल्लवी आणि रश्मी या दोघींच्याही पतीचे नाव राहुल हेच आहे. त्याही पुढील आश्चर्य म्हणजे दोघींच्या पतीचे आडनाव एकच म्हणजे राऊत आहे. पल्लवी आणि रश्मीच्या आयुष्यात आलेले पती राहुल राऊत हे खरोखरच योगायोग म्हणावा लागेल. सासरी नांदत असताना या दोन्ही मैत्रीण आता ग्रामपंचायत सरपंचपदासाठी एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. पल्लवी ही भाजपकडून तर रश्मी ही काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीतही या दोघाही आपली मैत्री जपताना दिसत आहेत. सरपंच पदासाठी दोघीच असल्यानं यात एक निवडून येणारं आणि दुसरी पराभूत होणार असली तरी, निवडून कोणीही येवो, यात मैत्रीचा विजय नक्की असल्याचे बोललं जात आहे.

कोल्हापुरातील बामणीत एका उमेदवाराकडे चार परप्रांतीय साधू, गावकऱ्यांना साधूंना लावलं पिटाळून

Kolhapur Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी भानामती यासारखे प्रकार दिसून येत आहेत. काही ठिकाणी तरी साधूंना बोलावून वेगवेगळ्या पूजाअर्चा केल्या जात असल्याचा प्रकार देखील उघड झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक देखील अवघ्या एका दिवसावर येवून ठेपली आहे. यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील बामणी गावामध्ये एका उमेदवाराकडे चार परप्रांतीय साधू आल्याचे समोर आलं आहे. हा प्रकार समजताच गावातील तरुणांनी या साधुंचा पाठलाग करत त्यांना गावातून पिटाळून लावलं आहे. सुरुवातीला गावातील उमेदवाराचा पत्ता विचारणारे साधू नंतर मात्र आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे कारण सांगितले. पण तरुणांनी रामेश्वर यात्रा गावात नसताना गावात काय काम असा जाब विचारला. त्यावेळी हे साधू कसे बसे तिथून निघून गेले.पण हे साधू नेमकं कोणत्या उमेदवाराकडे आले होते, तो उमेदवार साधूंना बोलावून काय करणार होता? हे मात्र गुलदस्त्यात राहीलं आहे.



ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, शेवटच्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठीवर भर
Nandurbar Gram Panchayat Election : नंदूरबार जिल्ह्यात 119 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उमेदवार आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सरपंच पदाच्या उमेदवारांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार असल्याने आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठीवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा भर आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या गावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहण्यास मिळत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका या वेळेस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका प्रतिष्ठेचा केल्या आहेत. गावातून लाऊड स्पीकर लावलेल्या वाहनातून प्रचार सुरू आहे. तर समर्थक मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत तर काही ठिकाणी रॅली काढून मतदार राजाला मतदानाचे आव्हान केले जात आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार राजा कोणाच्या बाजूने उभा राहतो हे 20 डिसेंबरला मतमोजणी नंतरच कळणार आहे.
Beed Gram Panchayat Election 2022: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आज संपणार

Beed Gram Panchayat Election 2022: बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचाती निवडणूकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्राम पंचायतींसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 


ग्राम पंचायत सदस्यांच्या 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार निवडणूकीला सामोरे जात आहेत. निवडणूक विभागाही सज्ज झाला आहे. दरम्यान ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा आज सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत.जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. 

Sangli Gram Panchayat Election: मिरज तालुक्यातील वड्डी गावामध्ये परदेशातील उच्च शिक्षण सोडून तरुणी उतरली सरपंच पदाच्या निवडणुकीत..

Sangli Gram Panchayat Election: सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी सरपंच पदाचे निवडणूक लढवणारे यशोधरा राजे शिंदे ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 21 वय असणारी यशोधरा ही एक उच्चशिक्षित तरुणी असून गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी ति थेट परदेशातून आपल्या शिक्षण अर्ध्यावर सोडून परतली आहे.यशोधरा राजे शिंदे ही जॉर्जिया या ठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे.मात्र यशोधरा ही शिक्षण सोडून थेट गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने सरपंच पदासाठी यशोधरा राजे हिने उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आहे.गाव खेड्यातील आजची तरुण पिढी नोकरी शिक्षण व्यवसायाच्या निमित्ताने पुढे शहरात आणि परदेशात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असताना विदेशातील उच्च शिक्षण सोडून गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन परतलेली यशोधरा राजे ही नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी आदर्श ठरत आहेत.

Beed Gram Panchayat Election: राजुरी ग्रामपंचायत मध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

Beed Gram Panchayat Election: बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नवगण राजुरी मध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय.. राजुरी ग्रामपंचायत साठी येथे 18 तारखेला मतदान होणार आहे एकूण 13 सदस्य आणि एक सरपंच अशा 14 जागेसाठी ही थेट लढत होणार आहे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या समोर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे आव्हान असणार आहे. 


या ग्रामपंचायत वर सध्या आमदार संदीप क्षीरसागर गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजुरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर गटाच्या ताब्यात राहते की जय दत्त सागर गट आपल्या ताब्यात घेते हे पाहणं मोठे असल्याचे ठरणार आहे याच ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा आढावा घेतला

Beed Gram Panchayat Election: राजुरी ग्रामपंचायत मध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

Beed Gram Panchayat Election: बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नवगण राजुरी मध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय.. राजुरी ग्रामपंचायत साठी येथे 18 तारखेला मतदान होणार आहे एकूण 13 सदस्य आणि एक सरपंच अशा 14 जागेसाठी ही थेट लढत होणार आहे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या समोर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे आव्हान असणार आहे. 


या ग्रामपंचायत वर सध्या आमदार संदीप क्षीरसागर गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजुरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर गटाच्या ताब्यात राहते की जय दत्त सागर गट आपल्या ताब्यात घेते हे पाहणं मोठे असल्याचे ठरणार आहे याच ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा आढावा घेतला

Beed Gram Panchayat Election: राजुरी ग्रामपंचायत मध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

Beed Gram Panchayat Election: बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नवगण राजुरी मध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय.. राजुरी ग्रामपंचायत साठी येथे 18 तारखेला मतदान होणार आहे एकूण 13 सदस्य आणि एक सरपंच अशा 14 जागेसाठी ही थेट लढत होणार आहे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या समोर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे आव्हान असणार आहे. 


या ग्रामपंचायत वर सध्या आमदार संदीप क्षीरसागर गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजुरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर गटाच्या ताब्यात राहते की जय दत्त श्री सागर गट आपल्या ताब्यात घेते हे पाहणं मोठे असल्याचे ठरणार आहे याच ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा आढावा घेतला

Made In China EVM Special Report : निवडणुकांच्या प्रचारात आता 'मेड इन चायना' ईव्हीएमची एन्ट्री

Osmanabad Gram Panchayat Election: उस्मानाबाद जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सध्या मेड इन चायना ईव्हीएम मशीन दाखल झाल्या असून.. मशीन होतकरू इच्छुक उमेदवार विकत घेताय गावागावात जाऊन सरपंच पदासाठी कोणाला निवडून द्यायचं वॉर्डातल्या कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे दाखवत आहे यासोबतच या वेळेस सरपंच पदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे कमालीची चुरस वाढली आहे मोबाईल म्हणजेच इंटरनेटच्या पेनेत्रेशन मूळ निवडणुकीच्या संदर्भात बदलून गेले व्हॉट्सअप स्टेटस ठेवून उमेदवार आपला प्रचार करत आहेत वेगवेगळी साहित्य सुद्धा बाजारात आलेत पण खरी गंमत आहे ती मेड इन चायना ईव्हीएम डमी मशीनची.

Pandharpur Gram Panchayat Election: वेळापूर ग्रामपंचायत रिंगणात तृतीयपंथी उतरल्याने रंगत वाढली

Pandharpur Gram Panchayat Election: माळशिरस तालुक्यातील वेळापूर हि सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची सत्ता आहे . याच ग्रामपंचायत मधून सरपंचपदासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तृतियपंथीय माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ हे निवडणूक रिंगणात उतरल्याने रंगतदार प्रचार सुरु असून माया याने आपला जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून जनतेत मते मागत फिरत आहे . या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर सुरु असताना मायाच्या उमेदवारीने वेळापूर सरपंचपदासाठी चुरस वाढल्याचे चित्र आहे .

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये  निवडणुकीचा रणसंग्राम

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये  निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून, प्रचाराचा धुरळा उडलाय. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. काल रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत.  उद्या (18 डिसेंबरला) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 


Pandharpur Gram Panchayat Election: वेळापूर ग्रामपंचायत रिंगणात तृतीयपंथी उतरल्याने रंगत वाढली 


Pandharpur Gram Panchayat Election: माळशिरस तालुक्यातील वेळापूर हि सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची सत्ता आहे . याच ग्रामपंचायत मधून सरपंचपदासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तृतियपंथीय माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ हे निवडणूक रिंगणात उतरल्याने रंगतदार प्रचार सुरु असून माया याने आपला जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून जनतेत मते मागत फिरत आहे . या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर सुरु असताना मायाच्या उमेदवारीने वेळापूर सरपंचपदासाठी चुरस वाढल्याचे चित्र आहे .


Osmanabad Gram Panchayat Election: उस्मानाबाद जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सध्या मेड इन चायना ईव्हीएम मशीन दाखल झाल्या असून.. मशीन होतकरू इच्छुक उमेदवार विकत घेताय गावागावात जाऊन सरपंच पदासाठी कोणाला निवडून द्यायचं वॉर्डातल्या कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे दाखवत आहे यासोबतच या वेळेस सरपंच पदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे कमालीची चुरस वाढली आहे मोबाईल म्हणजेच इंटरनेटच्या पेनेत्रेशन मूळ निवडणुकीच्या संदर्भात बदलून गेले व्हाट्सअप स्टेटस ठेवून उमेदवार आपला प्रचार करत आहेत वेगवेगळी साहित्य सुद्धा बाजारात आलेत पण खरी गंमत आहे ती मेड इन चायना ईव्हीएम डमी मशीनची.


Beed Gram Panchayat Election: बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नवगण राजुरी मध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय.. राजुरी ग्रामपंचायत साठी येथे 18 तारखेला मतदान होणार आहे एकूण 13 सदस्य आणि एक सरपंच अशा 14 जागेसाठी ही थेट लढत होणार आहे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या समोर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे आव्हान असणार आहे.. 


या ग्रामपंचायत वर सध्या आमदार संदीप क्षीरसागर गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजुरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर गटाच्या ताब्यात राहते की जय दत्त श्री सागर गट आपल्या ताब्यात घेते हे पाहणं मोठे असल्याचे ठरणार आहे याच ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा आढावा घेतला

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.