Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : राज्यात गेल्या महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तिसरीकडे राज ठाकरेंची (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे गेली. आता राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडून फाटाफूट टाळण्यासाठी मोठा डाव टाकण्यात आला आहे. 


महाविकास आघाडीची मोठी खेळी


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून विशेष काळजी घेतली आहे. उमेदवार निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू, असं प्रतिज्ञापत्र पक्षातील सर्व उमेदवारांकडून घेण्यात आले असून. पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच काळजी घेतली जात आहे. नाशिकच्या ओझर येथे खासगी विमानं तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीच्या या खेळीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 


मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?


संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल, जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.. विधानसभेचे वेगवान, अचूक निकाल तुम्हाला सकाळपासूनच एबीपी माझावर पाहता येणार आहेत... प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता? काय घडामोडी घडणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोण होणार किंगमेकर? या सर्व प्रश्नांची उत्तर, सविस्तर विश्लेषण.. तुम्हाला 'माझा'वर पाहता येणार आहे.


महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections    वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. 


एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/    या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.


आणखी वाचा 


Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : येवल्यात छगन भुजबळांना धक्का, माणिकराव शिंदे सलग दुसऱ्या फेरीत आघाडीवर