Wadala Vidhan Sabha Constituency 2024 : राज्यातील सर्व 288 जागांचे कल हाती आले असून सत्तेसाठी मॅजिक फिगर असलेली संख्या महायुतीने गाठल्याचं दिसून आलं. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि 9 विधानसभेच्या रिंगणात असलेले भाजपचे नेते कालिदास कोळंबकर हे यंदाच्या निवडणुकीत पहिला विजयाची नोंद करण्याच्या तयारीत आहेत. वडाळा मतदारसंघात कालिदास कोळमकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या कलानुसार कालिदास कोळंबकर जवळपास 12000 मतांनी आघाडीवर आहेत. या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार श्रद्धा जाधव पिछाडीवर आहे.
कालिदास कोळंबकर आता पर्यंत ८ वेळा सलग निवडून आले आहेत. ह्या वेळी निवडून आले तर त्याची नोंद जागतिक विक्रमात होईल. कालिदास कोळंबकर हे सुरुवातीला शिवसेना मधून नंतर नारायण राणे यांच्या सोबत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 च्या मोदी लाटेतही कोलंबकरानी विजय घोडदौड कायम ठेवली. त्यानंतर त्यांनी 2019 ला भाजप मध्ये प्रवेश केला आणि पुन्हा निवडून आले, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी 9व्यांदा अर्ज भरला आहे.
वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि मनसेकडून माजी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
हे ही वाचा -
Maharashtra Election Result : मोठी बातमी! पहिल्या कलानंतर मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाचा दावा