एक्स्प्लोर

Maharashtra Portfolio Allocation : अखेर खातेवाटप जाहीर, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी!

Maharashtra Cabinet Portfolio Allocation announced : महाराष्ट्र मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यानंतर अखेर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. कोणत्या मंत्र्यांला कोणतं खातं मिळालं, जाणून घ्या संपूर्ण यादी!

नागपूर : देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fandnavis Cabinet) मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter session) शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्‍यांना खातेवाटप (Khatevatap) जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्‍यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्‍यांना अधिकृत मंत्रालय मिळाले. 

अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस  यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत.  याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे. 

नितेश राणे, धनंजय मुंडे, संजय राठोड,भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, जयकुमार गोरे यांना कोणती मंत्रालयं मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. 

कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा  (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 
7.गणेश नाईक -  वन
8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9.संजय राठोड - मृदा व जलसंधारण 
10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल - विपणन, राजशिष्टाचार 
14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन 
15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा 
16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 
19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 
21.शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
22.माणिकराव कोकाटे - कृषी 
23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे - टेक्स्टाईल 
26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 
27.प्रताप सरनाईक - वाहतूक 
28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन, मिठागरे विकास 
29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 
31.आकाश फुंडकर - कामगार 
32.बाबासाहेब पाटील - सहकार 
33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री  (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 
35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 
38. योगेश कदम  - गृहराज्य शहर
39. पंकज भोयर - गृहनिर्माण,गृहराज्य ग्रामीण 

संबंधित बातम्या 

महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Embed widget