Maharashtra News Live Updates : अभिनेता शाहरूख खाम धमकी प्रकरण, एका संशयिताला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. दरम्यान, आजदेखील राज्यातील प्रमुख नेत्यांच्या राज्यातील वेगवेगळ्या भागांत सभा होणार आहेत. सभांच्या माध्यमातून हे नेतेमंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
ऐन निवडणुकीच्या काळात रिपाईला धक्का, रिपाइंचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंचा राजीनामा
ऐन निवडणुकीच्या काळात रिपाईला धक्का,
रिपाइंचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंचा राजीनामा
नवीन लादे यांनी रोजगार आघाडी, माथाडी आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र सचिवपदाचा व प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा
सत्तेत असताना कार्यकर्त्यांना सत्ता पदे मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
नवीन लादे यांचा राजीनामा रिपाई पक्षासाठी मोठा धक्का
नवीन लादे यांनी आरपीआय (आ) पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा दिला
लादे यांनी आपला राजीनामा आठवले यांना ई-मेल वर पाठविला
लादे आपल्या 400 हून अधिक समर्थकांसह दोन दिवसांत करणार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश...
अभिनेता शाहरूख खाम धमकी प्रकरण, एका संशयिताला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
अभिनेता शाहरूख खाम धमकी प्रकरण
एका संशयिताला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
या व्यक्तीकडे धमकी प्रकरणी पोलिस करत आहेत चौकशी
मागच्या आठवड्यात अभिनेता शाहरूखला आली होती धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 14 नोव्हेंबरला 3 जाहीर सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १४ नोव्हेंबरला ३ जाहीर सभा
छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई आणि मुंबईत मोदींची सभा
छत्रपती संभाजी नगरमध्ये मोदींची पहिली तोफ धडाडणार
खारघरमध्ये दुपारी पंतप्रधान मोदी मविआचा समाचार घेणार
छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मोदींची तिसरी सभा पार पडणार
संजय शिरसाट यांना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चापेक्षा कमी खर्च दाखविल्याने निवडणूक विभागाची नोटीस
छत्रपती संभाजीनगर ब्रेकींग
संजय शिरसाट यांना निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणूक खर्चापेक्षा कमी खर्च दाखविल्याने निवडणूक विभागाची नोटीस
शिरसाटांना २४ तासांत खुलासा करण्याचे निर्देश
उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंजन साळवे यांनाही नोटीस
माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक झाल्याचा आरोप
सोलापूर ब्रेकिंग
---
माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक आरोप
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आडम मास्तरांचा आरोप
माजी आमदार आडम मास्तर घरात नसताना प्रकार घडल्याचे आडम यांचे मत
काल रात्री सोलापुरातील बापूजी नगर येथे हा प्रकार घडल्याची माहिती
आडम मास्तर हे सध्या महाविकास आघाडीतून बंडखोरी करून माकपच्या तिकिटावर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान या प्रकरणनंतर माकप कार्यकर्त्यांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली
पोलीस सध्या या प्रकरणचा तपास करताय