एक्स्प्लोर

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत

Sanjay Raut on Sadabhau Khot : महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? असे म्हणत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या टीकेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या जोरदार पलटवार केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर तोफ डागली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहे. नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन शहरात पवार हे आपले कसे राजकीय गुरू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे? हे वारंवार सांगितला आहे. पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं आहे. भाजप सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असे हे म्हणत आहेत. त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षातील कामाचा लेखाजोखा पाहावा आणि आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं, याचं  देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आत्मचिंतन करावं, असा हल्लबोल त्यांनी केला. 

महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम 

पवार साहेब या देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर असं व्यक्त करून महाराष्ट्राचे मान शर्मेने खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहे. महाराष्ट्राला महान राजकारणाची परंपरा आहे. तुळशीच्या वृंदावनात भांगीची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहेत. महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.  

सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती

सदाभाऊ खोत यांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? टीका करायला लोकशाहीत काही हरकत नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य संपवले आहे. म्हणून आम्हाला या राज्यातील सत्ता बदलायची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती.  पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होतात, असा हल्लबोल संजय राऊत यांनी केलाय. 

आणखी वाचा 

Sadabhau Khot on Sharad Pawar: टीकेची झोड उठताच सदाभाऊ खोत नरमले, शरद पवारांबाबातच्या वक्तव्यावरुन जाहीर माफी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget