एक्स्प्लोर

Kalwan Surgana Vidhan Sabha Election Result 2024 : कळवण-सुरगाणा मतदारसंघात नितीन पवार दुसऱ्यांदा विजयी, माकपच्या जे पी गावितांचा केला पराभव

Kalwan Surgana Vidhan Sabha Election Result 2024 : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ए. टी. पवारांचे सुपुत्र नितीन पवार यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Kalwan Surgana Vidhan Sabha Election Result 2024 : आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात ( Kalwan-Surgana Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) विद्यमान आमदार नितीन पवार हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांच्याकडून नितीन पवार यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. तर दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेणाऱ्या माकपसाठी महाविकास आघाडीने कळवण विधानसभा मतदारसंघ सोडली. माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित (J P Gavit) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात नितीन पवार विरुद्ध जे पी गावित यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र, नितीन पवार या निवडणुकीत विजयी झाले असून ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 

एकूण मते : 

 नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार)
- एकूण पडलेली मते : 118366
- जे पी गावित
- एकूण पडलेली मते : 109847

- नितीन पवार 8519 मतांनी विजयी

कळवण आणि सुरगाणा मतदारसंघ 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला. त्यापूर्वी कळवण मतदारसंघावर राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री स्वर्गीय ए. टी. पवार यांचे तर सुरगाणा-पेठ मतदारसंघावर माकपचे जीवा पांडू गावित यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले. मात्र, कळवण-सुरगाणा मतदारसंघ एकत्र झाल्यामुळे ए. टी. पवार आणि जे. पी. गावित यांना एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ए. टी. पवार यांनी जे. पी. गावितांचा पराभव केला तर 2014 च्या निवडणुकीत जे. पी. गावितांनी ए. टी. पवारांचा पराभव केला होता. त्यानंतर ए. टी. पवारांचे निधन झाले. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ए. टी. पवारांचे सुपुत्र नितीन पवार यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) लढवली. 2019 च्या निवडणुकीत नितीन पवार यांनी जे. पी. गावितांचा पराभव केला होता.

स्थानिक पातळीवरील राजकारणात बदल

दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना दुभंगल्याने स्थानिक पातळीवरील राजकारण बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत कळवण मतदारसंघात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा दुप्पट मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे माकप-राष्ट्रवादी अजित पवार गटातील थेट लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात 2200 कोटी रुपयांची विकासकामे केल्याने मतदार विकासासाठी पुन्हा आपल्याला कौल देतील, असा विश्वास विद्यमान आमदार नितीन पवार यांना आहे. तर विविध मुद्यांवर केलेल्या मोर्चे तसेच पेसा भरतीसाठी विविध आंदोलने केल्याचा फायदा जे. पी. गवितांना मिळू शकतो, असे बोलले जात होते. मात्र, कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात नितीन पवार यांनी बाजी मारली. 

आणखी वाचा 

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएम की समाजवादी? कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget