एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?

Dindori Assembly Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात दाखल झाले. अजित पवारांकडून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल अखेर वाजले आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे. नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून धनराज महाले यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्यात आला आहे.  महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुनिता चारोस्कर यांना तिकीट दिले आहे. दिंडोरीत कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.   

दिंडोरी (Dindori) विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा (विधानसभा) मतदारसंघांपैकी एक आहे. हे अनुसूचित जमाती (ST) समुदायासाठी राखीव आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांचा विजय झाला होता. विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाट असूनही ते निवडून आले होते. नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केल्याने शरद पवारांकडून त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांना 1 लाख 24 हजार 520 मतं मिळाली होती. तर शिवसेनेने भास्कर गावित यांना तिकीट दिले होते. त्यांना 63 हजार 707 मतं मिळाली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात दाखल झाले. अजित पवारांकडून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीकडून सध्या उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. आता शरद पवार नेमकी कुणाला संधी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

दिंडोरीत महायुतीत मैत्रीपूर्ण लढत?

महायुतीकडून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिंडोरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार धनराज महाले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. धनराज महाले हे शिवसेनेकडून  दिंडोरी मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी केली आहे. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत धनराज महाले विरुद्ध नरहरी झिरवाळ असा सामना रंगला होता. या निवडणुकीत धनराज महाले विजयी झाले होते. धनराज महालेंना 68 हजार 569 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांना 68 हजार 420 मतं मिळाली होती. धनराज महाले या निवडणुकीत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेना शिंदे गटाचा एबी फॉर्म दिलाय. त्यामुळे आता महायुतीचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता महायुतीत मैत्रीपूर्ण लढत पहायला मिळणार की? कुठला उमेदवार माघार घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्तPune Vidhansabha Election :  पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
Embed widget