एक्स्प्लोर

भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातोय, मला बरं वाटतंय पण...परभणीच्या सभेत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे 

माझा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जातोय, बर वाटतंय पण मी मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढवत नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते परभणीत (Parbhani) बोलत होते.

Uddhav Thackeray : माझा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जातोय, बर वाटतंय पण मी मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढवत नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते परभणीत (Parbhani) बोलत होते. मी तुमच्यासाठी निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, यंत्रणा आहे तरीही ते उद्धव ठाकरेंना हरवू शकले नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावला किंमत आहे असंही ते म्हणाले.  परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा आयोजीत केली होती. 

गद्दारीची किड आपल्या गडाला लागू दिली नाही याबद्दल आपला मी आभारी आहे असे उद्धव ठाकरे परभणीत म्हणाले. लोकसभा जिंकली आता विधानसभा जिंकायची आहे. महाविकास आघाडीचे इथले 4 ही उमेदवार निवडून द्या , अन्यथा महाराष्ट्र आपल्या हाथून जाईल असेही ते म्हणाले. अदानीच्या घशात मुंबई घातली आहे. अदानीच्या घशातून मुंबई मी काढून घेणार असल्याचे ठाकरे म्हमाले. सर्वांना परवडेल अशा किमतीत घर देणार 
असंही ते म्हणाले. 

 मोदींजी तुम्ही कितीही प्रयत्न करा मला या जनतेपासून तुम्ही तोडू शकत नाही

अमित शाह मिंदे यांना काही लाज लज्जाच नाही. त्यांच्याकडील ही संपत्ती ढापलेली संपत्ती आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. मोदींजी तुम्ही कितीही प्रयत्न करा मला या जनतेपासून तुम्ही तोडू शकत नाही असेही ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र म्हणजे त्यांना नोटा छापायची मशीन वाटतेय. आज नांदेडमध्ये मी आणि मोदी दोघेही होतो. देशाचा पंतप्रधान हा एका फडतूस पक्षाच्या प्रचारासाठी कसा येतो? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला. मोदी म्हणतात की काँग्रेसला संविधान बदलायचे आहे, मात्र संविधान हे संसदेत बदलतात, यांना हेच कळत नाही असेही ते म्हणाले. काँग्रेसवर देखील टीका करताहेत, मी काही काँग्रेसचा प्रवक्त्या नाही पण महाविकास आघाडीचा असल्याने मी बोलणारच असेही ते म्हणाले. 

तिकडे चीन घुस्तोय मात्र बोलण्याची हिम्मत नाही यांची

तिकडे चीन घुस्तोय मात्र बोलण्याची हिम्मत नाही यांच्यात. मोदी तुम्ही पंतप्रधान आहात अमित शाह तुम्ही गृहमंत्री आहात. ज्या वेळेला मोदी आणि अमित शाह इथे भाषण देत होते तिकडे मणिपूर मध्ये महीलांवर बलात्कार करून जाळण्यात आले होते. देशात महिलेची अब्रू लुटली जाते अन् तुम्ही इकडे येवून मत मागताहेत. लाज वाटली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मणिपूरमध्ये कुणाचे सरकार आहे. दोघंही पद सोडा अन् पक्षाचे स्टार प्रचारक व्हा आमचे काही म्हणणे नाही. भाजप महणजे आता संकरित पक्ष झालंय. सर्व पक्षाचे लोक घेवून यांनी संकरित पक्ष तयार केलाय असेही ठाकरे म्हणाले. या दोघांनी पक्ष ठेवलाच नाही असे लोक सांगून मला पाठिंबा देतायेत. 

1500 मध्ये तुमचे घर चालते का?

1500 मध्ये तुमचे घर चालते का सांगा. महिलांनो तुमच्यापर्यंत हे पैसे येईपर्यंत महागाई किती वाढली बघा.  सरकार आल्यावर 4000 रुपये आपण तरुणांना देऊ. 5 वर्ष सर्व भाव आपण स्थिर ठेऊ असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही कधी सांगणार 10 वर्षात तुम्ही काय केले ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पण तुम्ही भ्रष्टाचार केला आहे. मिंदे म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला, याची दाढी उडत नाही का वाऱ्याने. तुमचे हाथ एवढे अशुभ आहेत की छत्रपतींचा पुतळा पडला असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget