आपण महाविकास आघाडीत, पण जिथं जिथं मशाल तिथं मशाल आलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचं आवाहन
Uddhav Thackeray : आपण महाविकास आघाडीत आहोत, पण जिथं जिथं मशाल तिथं मशाल आलीच पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
Uddhav Thackeray : काल शरद पवार (Sharad Pawar) यांनी नांदेड उत्तरचे (Nanded North Assembly) महाविकास आघाडीचे उमेदवार हे काँग्रेसचे अब्दुल सत्तार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी त्यांच्या उमेदवारासाठी नांदेडमध्ये हजेरी लावली. संगीता पाटील या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. नांदेड उत्तरच्या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे दोघेही उमेदवार उभे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी बोलताना उद्दव ठाकरे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीत आहोत, पण जिथं जिथं मशाल तिथं मशाल आलीच पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
मशालीशिवाय आता महाराष्ट्राला वाचवणारे दुसरे कोणी दिसत नाही,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला उमेदवार हे काँग्रेसचे अब्दुल सत्तार असल्याचे सांगत आहेत. त्यात आज उद्धव ठाकरे यांनी नांदेडमध्ये हजेरी लावली. सह संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांच्या कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या उमेदवार या संगीता पाटील असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मशालीशिवाय आता महाराष्ट्राला वाचवणारे दुसरे कोणी दिसत नाही, आपण महाविकास आघाडीत आहोत पण जिथे जिथे मशाल चिन्हावर आपले उमेदवार आहेत तिथे मशालच आली पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
नांदेड उत्तरमध्ये चौरंगी लढत
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. या लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलंआहे. या मतदारसंघात महगाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध अब्दुल सत्तार (काँग्रेस) विरुद्ध संगीता पाटील (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध मिलिंद देशमुख (भाजप बंडखोर) अशी चौरंगी लढत होत आहे. त्यामुळं यावेळी नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नांदेडसह सोलापूर दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीत असलो तरी जिथं जिथं मशाल चिन्ह दिसेल तिथं मशाल आलीच पाहीजे असं आवाहन केलं.
महत्वाच्या बातम्या: