Sharad Pawar: भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची फूट, नागपूरमध्ये पाऊल ठेवताच शरद पवारांचं आरक्षणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
विदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. नागपूर जिल्ह्यात तीन उमेदवार उभारले आहेत.
Nagpur: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता अवघ्या काही दिवसांचा राजकीय खेळ शिल्लक असताना भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकारणाचा केंद्रबिंदू बनत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणावर महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आरक्षणावर माझ्या पक्षाची भूमिका सांगतो असं म्हणत त्यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा घेत आरक्षणाची मर्यादा वाढण्याची स्थिती असल्याचं म्हणलंय. जातीय जनगणना तीन वर्षांपासून आमची मागणी असल्याचे सांगत ती झाल्यानंतर पाहिजे ते रास्त चित्र देशासमोर येईल. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची स्थिती दिसते. जनगणनेनंतर सगळं चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार म्हणालेत.
दरम्यान विदर्भातील दौऱ्याला सुरुवात करत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विदर्भाच्या परिस्थितीचा आढावा पवारांनी घेतलाय. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 11 उमेदवार रिंगणात आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
आघाडीच्या वतीने आमच्या प्रचाराची सुरुवात कालच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि मी आमच्या तिघांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे. आज मी नागपूरला आलोय तीन सभा घेऊन मी हिंगणघाट भागात जाणार आहे. दोन दिवस मी विदर्भात आहे. त्यानंतर मराठवाड्यात 18 तारखेपर्यंत माझा कंटिन्यू दौरा आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
आरक्षणावर पक्षाची भूमिका सांगतो..
महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेला अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरंगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आरक्षणावर मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो असे म्हणत जातीय जनगणना ही तीन वर्षांपासून आमची मागणी असल्याचं पवारांनी सांगितलं. जातीय जनगणना झाली पाहिजे. त्यानंतरच रास्त चित्र देशाच्या समोर येईल. आरक्षणाच्या मर्यादा वाढविण्याचे स्थिती दिसते. जनगणनेनंतर याचे स्पष्ट चित्र समोर येईल असे शरद पवार म्हणाले.
विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय?
विदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. नागपूर जिल्ह्यात तीन उमेदवार उभारले असून शरद पवार यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विदर्भाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. माझा विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आमचं काम त्यासाठी मी आणि माझे सहकारी राज्यभरात प्रचार करणार आहेत. असे शरद पवार यांनी सांगितले.
भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट
उमेदवारीवरून भंडारा जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा जिल्ह्यात वाढविणासाठी ज्यांनी मेहनत घेतली, अशांना डावलून पक्षानं वेळेवर आयात उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यामुळं भंडारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं बघायला मिळतं आहे. महाविकास आघाडीनं चरण वाघमारे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांच्यासह शरद पवारांसोबत गेलेल्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. पक्षाकडं उमेदवारी मागितल्यानंतर ती नं मिळाल्यानं ठाकचंद मुंगूसमारे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीसमोर आव्हान उभं केलं आहे.