Purandar Assembly constituency: पुरंदर मतदारसंघात शिंदे गटाने फडकवला विजयाचा झेंडा! विजय शिवतारेंनी केला संजय जगतापांचा पराभव
Purandar Assembly constituency: पुरंदर मतदारसंघात शिंदे गटाने विजयाचा झेंडा फडकवला. विजय शिवतारेंनी संजय जगतापांचा पराभव केला आहे.
Purandar Assembly constituency: पुंरदर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तिरंगी लढत झाली होती. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला मिळाली होती. या मतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार संजय जगताप यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती. तर महायुतीकडून शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे नेते विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी संभाजी झेंडे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने संभाजी झेंडे यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिल्याने महायुतीत मैत्रीपुर्ण लढत झाली होती. मात्र, या मतदारसंधात शिवसेना शिंदे गटाने झेंडा फडकावला आहे.
महाराष्ट्रातील पुरंदर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली होती, मात्र शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार विजय शिवतारे यांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार संजय जगताप यांचा 24188 मतांनी पराभव केला आहे. त्यांना एकूण विजय शिवतारे यांना 125819 मते मिळाली आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे संजय जगताप यांचं आव्हान होतं, त्यांना 125819 मते मिळाली. राज्याच्या राजकारणात ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला विजय निश्चित करण्यासाठी जोरदार कंबर कसली होती, मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात शिंदे गटाने विजय खेचून आणला आहे.
पुरंदरचा राजकीय इतिहास
या मतदारसंघात 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली, ज्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर खैरे विजयी झाले. त्यानंतर 1967 मध्येही ज्ञानेश्वर खैरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सलग दुसरा विजय मिळवला. यानंतर 1972 मध्ये समाजवादी पक्षाचे जाधवराव ज्योतियाजी विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे वर्चस्व खोडून काढले आणि पुरंदरच्या राजकारणात बदल घडवला. 1978 मध्ये जनता पक्षाचे दादा जाधवराव विजयी झाले आणि 1980 मध्ये संभाजीराव कुंजीर यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत पुन्हा काँग्रेसची जागा जिंकली. त्यानंतर 1985 मध्ये पुन्हा दादा जाधवराव जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. 1990 मध्ये ते जनता दलाच्या तिकिटावर विजयी झाले आणि ही जागा पुन्हा एकदा त्यांच्या नावावर झाली. 1995 आणि 1999 मध्येही जनता दलाकडून निवडणूक जिंकून दादा जाधवरावांनी ही जागा कायम राखली.
राष्ट्रवादीची एंट्री
पुरंदरच्या राजकारणात 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक टेकवडे विजयी झाल्याने मोठे बदल झाले. 2009 मध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आणून विजय मिळवला आणि 2014 मध्येही शिवतारे यांनी विजयाची पुनरावृत्ती केली, या मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव आणखी मजबूत झाला.
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा पराभव करताना पुन्हा एकदा काँग्रेसचा प्रभाव दाखवला. या निवडणुकीत संजय जगताप यांना 1,30,710 मते मिळाली, तर विजय शिवतारे यांना 99,306 मते मिळाली. या निकालाने पुरंदरमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाचे संकेत दिले आणि शिवसेनेविरुद्ध काँग्रेसची मजबूत पकड म्हणून या निकालाकडे पाहिले गेले. मात्र शिवसेनेने पुन्हा एकदा आपला विजयाचा गुलाल उधळला आहे.