Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
Prakash Ambedkar : भाजपने जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध आहे हे जाहीर करावं असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.
बीड : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार शेख मंजुर चाँद साहब यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. ओबीसी आरक्षण आणि मनोज जरांगेंची मागणी याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला आव्हान दिलं. याशिवाय एससी आणि एसटी आरक्षणातील वर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या मुद्यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे दोन्ही गट यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी विधानसभेत ओबीसी समाजाचे आमदार हवेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
ओबीसी प्रमाणं एससी, एसटी आरक्षण संकटात
देशातील ओबीसी आरक्षण संकटात आहे त्या प्रमाणं एससी आणि एसटीचं आरक्षण देखील संकटात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात एससी आणि एसटी आरक्षणात क्रिमिलेअर टाकण्यात आलंय. यामुळं एका कुटुंबात एकानं व्यक्तीनं एकदा आरक्षणाचा लाभ घेतल्यास ते कुटुंब क्रिमिलेअरमध्ये येतं. क्रिमिलेअर मध्ये जो असेल त्याला आरक्षण लागू होणार नाही. हे तुम्हाला मंजूर आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेनं आरक्षणाबाबतच्या निर्णयाला पाठिंबा दिला, नवी समिती स्थापन केलीय, तुम्ही त्यांना मतदान दिलं तर ते काय करतील असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.
मनोज जरागेंच्या मागणीला विरोध हे भाजपनं सांगावं
भाजपनं भूमिका घ्यावी की जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध आहे. भाजपनं ही भूमिका घ्यावी जरांगे पाटील यांची जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे त्याला विरोध आहे हे जाहीरपणे म्हणावे. पण भाजप काय म्हणतंय, की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याला पाठिंबा आहे. तमचा पाठिंबा आहे तर आमचं वाटोळं का करुन घ्यायंचं, असा सवाल ओबीसी समाज करतोय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
ओबीसी समाज म्हणतोय आम्ही आमचं वाटोळ का करुन घ्यावं. दोन्ही आघाड्यांनी ओबीसी समाजाला प्रतिनिधी दिला नाही. हे लक्षात घ्या , विधानसभेत आमदार पाठवायचा असेल तर उमेदवार पाहिजे. उमेदवार नाही तर आमदार कसा जाणार, तिथं निर्णय घेतला तर ओबीसी आरक्षण कसं वाचवणार असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
वंचित बहुजन आघाडीनं आरक्षण यात्रा ज्यावेळी काढली तेव्हा किमान ओबीसीचे 100 आमदार विधानसभेत पाठवणार आहोत, असं सांगितलं होतं. त्यामाध्यमातून ओबीसी आरक्षण वाचवणार, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इतर बातम्या :