एक्स्प्लोर

Nashik East Assembly Constituency : नाशिक पूर्वमध्ये राडा, गीते समर्थकांची स्कॉर्पिओ फोडली, गणेश गीतेंचा ढिकलेंना गंभीर इशारा; म्हणाले, गुंडागर्दी...

Nashik East Assembly Constituency : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात पुन्हा एकदा जोरदार राडा झाला.

Nashik East Assembly Constituency : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Assembly Constituency) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) काल पुन्हा एकदा जोरदार राडा झाला. मतदानाच्या स्लिपा वाटपावरून वाद झाला असून यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते (Ganesh Gite) यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडण्यात आली. यापुढे माझ्या एकही कार्यकर्त्याला हात लावला तर मी पोलीस आयुक्तालयासमोर जाऊन आंदोलन करेल. निवडणुका येतात जातात मात्र अशा पद्धतीची गुंडागर्दी खपवून घेणार नाही, असा इशाराच आता गणेश गीतेंनी ढिकलेंना दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच नाशिक पूर्व मतदारसंघात राडा झाला होता. राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि गणेश गीते समर्थक आमनेसामने आले होते. हा वाद थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत गेला होता. आता पुन्हा एकदा नाशिक पूर्व मतदारसंघात राडा झाला. राहुल ढिकले समर्थकांकडून शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक गाडी फोडण्यात आली. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून या गाडीतून स्लिपा वाटप करत असल्याची माहिती मिळाली तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटपाचा संशय आल्याने हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. 

शहराला त्रास देण्याचे काम 

याबाबत गणेश गीते म्हणाले की, माझ्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद काय झाले हे मला माहित नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला, त्या ठिकाणी अचानक 50 गुंड जमा झाले. पाच वर्षापासून शहरात गुंड पाळलेले आहेत. या वीस दिवस काम करण्यासाठीच पाळले आहेत. पैसे वाटण्याच्या कारणावरून माझी गाडी फोडली होती. त्यात एक हजार रुपयाची ही रिकव्हरी झाली नाही.  आता देखील गाडी फोडली, त्या गाडीत काही सापडले का?  निवडणूक आपल्या हातातून जाताना दिसत आहे, त्यामुळे शहराला त्रास देण्याचे काम सुरु केले आहे. 

गुंडागर्दी खपून घेणार नाही

मी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन बसणार आहे. या शहराच्या नागरिकाला अशा पद्धतीने त्रास होत असेल तर काय करायचे? गाडी कोणाची होती मला माहित नाही. मात्र, सर्वसामान्याची असेल तर त्याचा काय दोष? माझ्या भावाची गाडी फोडली होती, त्यात पैसे नव्हते. कार्यकर्त्याची गाडी फोडली,  त्यात देखील पैसे आढळले नाहीत.  ते रामाच्या मंदिराजवळ राहतात, राम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात, असे धंदे सुरु आहेत. पाच वर्ष मतदारसंघात विकास केला असता तर ही वेळ आली नसती. माझ्या कार्यकर्त्याला कोणी हात जरी लावला तरी मी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करेल, अशी गुंडागर्दी खपून घेणार नाही, असा इशारा गणेश गीते यांनी दिलाय. 

कमलेश बोडकेंना तडीपारीची नोटीस

दरम्यान, मतदानाला अवघा एक दिवस बाकी आहे. मात्र, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनी राहुल ढिकले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीतेंच्या नातेवाईक असल्यामुळे मला पोलिसांसोबत संगनमत करून तडीपारची नोटीस पाठवण्यात आली, असे कमलेश बोडके यांनी म्हटले आहे. यामुळे आता नाशिक भाजपमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा 

Sharad Pawar : अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSalil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget