MNS Candidate List : राज ठाकरेंचा धडाका सुरुच, मनसेची तिसरी यादी जाहीर, धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार दिला, तिसऱ्या यादीत कुणाला संधी?
MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत मनसेनं 13 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर अन् ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत.
मनसेच्या तिसऱ्या यादीत कुणाला स्थान?
1. पप्पू उर्फ मंगेश पाटील - अमरावती
2. दिनकर धर्माजी पाटील-नाशिक पश्चिम
3. डॉ.नरसिंग भिकाणे - अहमदपूर-चाकूर
4.अभिजित देशमुख - परळी
5.सचिन रामू शिंगडा - विक्रमगड
6.वनिता शशिंकात कथुरे- भिवंडी ग्रामीण
7.नरेश कोरडा-पालघर
8.आत्माराम प्रधान- शहादा
9.स्नेहल सुधीर जाधव- वडाळा
10. प्रदीप वाघमारे - कुर्ला
11.संदीप पाचंगे-ओवळा माजिवाडा
12.सुरेश चौधरी -गोंदिया
13.अश्विन जयस्वाल -पुसद
धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार
राज ठाकरे यांनी यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्या प्रमाणं मनसेनं एकला चलोची भूमिका कायम ठेवली आहे. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल मनसेकडन 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली . आज मनसेनं 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. म्हणजेच मनसेकडून आतापर्यंत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंकडून अभिजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या दिनकर पाटील यांचा मनसेत प्रवेश, लगेच उमेदवारी
भाजपनं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या उमेदवारी देण्याच्या निर्णयाला दिनकर पाटील यांचा विरोधा होता. पाटील यांनी काल त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. आज दिनकर पाटील यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांच्या यादीमध्ये दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी शिवसेनेचे ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्यात आला आहे. संदीप पाचंगे हे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात लढतील.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी खालीलप्रमाणे....#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/97ZRgOmc4u
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 23, 2024
इतर बातम्या :
उद्धव ठाकरेंनी नातं जपलं नाही, अमित ठाकरेंविरुद्ध उमेदवार दिल्याने माजी आमदाराने करुन दिली आठवण