रोज रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? भाजप आमदार भीमराव केराम यांचं बेताल वक्तव्य
रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे? असे बेताल वक्तव्य नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी केलं.
MLA Bhimrao Keram : रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे? असे बेताल वक्तव्य नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी केलं. विशेष म्हणजे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे या व्यासपीठावर उपास्थित होत्या. केराम यांच्या प्रचारासाठी काल बोधडी येथे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केराम यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भीमराव केराम गावात फिरकले नाहीत अशी ओरड होत असते. यावर बोलताना आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली. गावात येऊन काय मुके घ्यायचे का? मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचे काम मी करतो असे केराम म्हणाले होते. आता या वक्तव्यावरून केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किनवट विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजपकजून भीमराव केराम तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रदिप नाईक हे निवडणूक लढवत आहेत. अत्यंत चुरशीची ही निवडणूक होत आहे. कोण निवडून येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
किनवट विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लोकसभेला हा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव रामजी केराम (MLA Bhimrao keram) 89,628 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदिप हेमसिंग नाईक (Pradeep Naik) यांचा परभाव केला होता. जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रदीप जाधव हे विजयी झाले होते. तर त्यावेळी अपक्ष असलेले भीमराव रामजी केराम यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात अनेक राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या काळात काही नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यामुळं वांदग निर्माण होताना दिसत आहे. अशातच किनवटचे भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं ते अडचणीत सापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: