(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana Vidhan Sabha Constituency : बुलढाण्यात आमदार म्हणून संजय गायकवाड यांनाच पसंदी, 1400 मतांनी जयश्री शेळकेंचा पराभव!
Sanjay Gaikwad Update Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यंदा प्रथमच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे.
Buldhana Vidhan Sabha Constituency 2024 Sanjay Gaikwad Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगला होता. राज्यातील 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले होते. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड 1473 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालात बुलढाणाची जागा शिवसेनाचे संजय रामभाऊ गायकवाड यांनी जिंकली होती.
बुलढाण्यात आमदार म्हणून संजय गायकवाड यांनाच पसंदी दिली आहे. बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाड यांना जवळपास 90 हजार मतदान झाले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांना 88 हजार मतदान झाले. या काटे की टक्करमध्ये संजय गायकवाड यांनी बाजी मारली.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ येथे 1952 ते 1990 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गोड पहिल्यांदा विजयी झाले आणि काँग्रेसची 38 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. 1995 मध्ये शिवसेनेचे विजयराज शिंदे येथून निवडणूक जिंकले. मात्र 1999 मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा पुनरागमन केले. 2004 मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा विजयराज शिंदे यांच्या हातून पराभव स्वीकारावा लागला. 2014 मध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा येथे काँग्रेसचा झेंडा फडकवला. 2019 मध्ये शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला पराभवाची चव चाखायला लावली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा शहर विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सकपाळ आणि वंचित बहुजन आघाडीच्या विजय हरिभाऊ शिंदे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत संजय गायकवाड यांना 67,785 मते मिळाली होती. तर विजय शिंदे यांना 41,710 मते पडली होती. तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सकपाळ 31 हजार 316 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय गायकवाड हे निश्चित होते, तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली आहे. बुलढाणा मतदारसंघात आतापर्यंत एकूण 15 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांच्या मतदान पद्धतीचे आणि विजय-पराजयाचे विश्लेषण केले तर एक गोष्ट समोर येते की, येथे नेहमीच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच थेट लढत पाहायला मिळत आहे. 1990 पासून शिवसेनेने सलग दोनदा येथे विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याचा फायदा शिवसेना शिंदे गटाला झाला हे नक्की.
हे ही वाचा -