Maharashtra Assembly Election 2024: जरांगे पॅटर्न निष्प्रभ करण्यासाठी मराठवाड्यात भाजपचा स्पेशल 16 फॉर्म्युला, वाचा नेमकं प्रकरण काय?
जरांगेंचा पॅटर्न निष्प्रभ करण्यासाठी भाजपने मराठवाड्यातून सर्वाधिक उमेदवार देण्याचा निर्धार केला असून त्यांचा स्पेशल 16 फॉर्म्यूला नक्की कसा राहणार वाचा..
BJP Marathwada Candidate List: मराठवाड्यात जरांगे पाटील यांचा फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने मराठवाड्यातून सर्वाधिक मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मराठवाड्यात भाजपने 16 उमेदवार यांची यादी जाहीर केली .यात तीन मतदारसंघ राखीव आहेत. 13 खुल्या मतदारसंघातुन मराठवाडयात दहा मराठा समाजाचे उमेदवार दिले आहेत . औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अतुल सावे आणि तुषार राठोड हे दोन ओबीसी चेहरे दिले आहे. तर प्रशांत बंब जैन समाजाच्या चेहरा गंगापूर मतदारसंघातून निवडणुकीत उतरवला आहे..
विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथं मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही तेथील आपल्या विचारांच्या उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून त्यांना निवडून आणायचं आहे. ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहे त्यांनी भरावे, पण 29 ऑक्टोबरला मी सांगितलेल्या ठिकाणी अर्ज कायम ठेवून निवडणुक लढवायची असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केली होती. अंतरवाली सराटीमध्ये सभा घेऊन त्यांनी जाहीरपणे ही भूमिका घेतल्याचे दिसले. आता जरांगेंचा पॅटर्न निष्प्रभ करण्यासाठी भाजपने मराठवाड्यातून सर्वाधिक उमेदवार देण्याचा निर्धार केला असून त्यांचा स्पेशल 16 फॉर्म्यूला नक्की कसा राहणार वाचा..
मराठा समाजातील कोणत्या उमेदवारांना देणार प्रतिनिधीत्व?
- फुलंब्री विधानसभा
अनुराधा चव्हाण - भोकरदन -जाफ्राबाद विधानसभा
संतोष दानवे - परतूर-मंठा विधानसभा
बबनराव लोणीकर - औसा विधानसभा
अभिमन्यू पवार - निलंगा विधानसभा
संभाजी पाटील निलंगेकर - तुळजापूर विधानसभा
राणाजगजितसिंह पाटील - हिंगोली विधानसभा
तान्हाजी मुटकुळे - जिंतूर विधानसभा
मेघना बोर्डीकर - नायगाव विधानसभा
राजेश पवार - भोकर
श्रीजया चव्हाण
या ओबीसी उमेदवारांना मिळणार भाजपकडून प्रतिनिधित्व
- औरंगाबाद पूर्व
अतुल सावे - मुखेड
तुषार राठोड -
अल्पसंख्यांक उमेदवार
गंगापूर
प्रशांत बंब
राखीव मतदारसंघात या उमेदवारांना संधी
- बदनापूर
नारायण कुचे - केज
नमिता मुंदडा - किनवट
भीमराव केराम
भाजपने उमेदवार यादी जाहीर केली
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता. दरम्यान आज भाजप उमेदवार यादी जाहीर करत मैदानात उतरला आहे.
हेही वाचा: