एक्स्प्लोर

Balasaheb Thorat : राज्यघटना वाचवायची असेल तर संघर्ष करावा लागेल, आम्ही तो संघर्ष करु : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thackeray : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. या पराभवावर त्यांनी भाष्य केलं आहे.

अहिल्यानगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10560 मतांनी पराभव केला. संगमनेरच्या पराभवावर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं. निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात हे नाकारता येत नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 

धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना , केवळ राजकारणासाठी वापरण्यासाठी घेतल्या , हे सुद्धा कारण आहे, याच्यातून त्यांना या जागा मिळालेल्या आहेत.  खर म्हणजे यश नाही, त्यांनी ओढूण ताणून यश मिळवलेलं आहे.  क्लृप्त्या करुन यश मिळवलेलं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

खर म्हणजे ना कुणाला रोजगार दिला, महागाई कमी केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली, ना स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रकरणात लोकांना उत्तरं दिली, याच्यात कसं यश मिळतं याबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. 

ते पुढे म्हणाले की, ज्या साधनांचा वापर भाजप करत आहे, तो लोकशाहीला मोठा धोका आहे. कोणता दर्जा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा असणार याची काळजी आहे. पुढच्या काळात लोकशाही कुठं जाईल याची काळजी वाटणारी निवडणूक आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.   

लाडकी बहीण योजना राजकीय कारणासाठी होती. सातशे कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी पकडल्या जातात, काय काय नाही त्याचा वापर केला. धर्माचा वापर केला, माणसांमध्ये भेद निर्माण केला. महायुतीच्या लोकांनी चार काम चांगली आणखी चांगली करु याची चर्चा झाली नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेरमध्ये जे काही झालं, त्याची कारणं काय होती याचा शोध घेतला जाईल, या जनतेनं 40 वर्ष स्वीकारलं, कुठं काय घडलं हे पाहावं लागेल. संसाधनांचा वापर ही आमच्या तालुक्यात नव्हती, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एवढं मोठं बहुमत त्यांना मिळतं आहे त्याची कारणमीमांसा केली जाईल,कशाचा परिणाम आहे, ज्या संसाधनांचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. धर्माचा वापर केला जातो, जातीचा वापर केला जातो, भाजपची ही खरी साधनं आहेत.

देशातील लोकशाही वाचवायची असेल, राज्य घटना वाचवायची असेल तर संघर्ष करावा लागेल. आम्ही तो संघर्ष करु, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महायुतीनं महाविकास आघाडीची लाट परतवली असं म्हणता येईल. निवडणूक पुढं ढकलण्यात आली. पानच्या पानं जाहिराती होत्या,  जाहिराती ऐकाव्या लागत होत्या, त्यांनी कोणत्याही रोजगाराच्या प्रश्नावर बोलले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले, महागाई बाबत बोलले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. 

इतर बातम्या : 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget