Ajit Pawar : तुमच्या गावातील पोलीस स्टेशन भाड्याच्या घरात अन् निघाले राज्याचं नेतृत्त्व करायला, अजित पवारांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लोबोल केला.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी इस्लामपूरमध्ये निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी निशिकांत भोसले पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं. यावेळी अजित पवार यांनी जयंत पाटील, राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. स्व. विलासराव शिंदे यांनी आष्टा- इस्लामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी जीव असेपर्यंत काम केलं, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय आठवले आम्ही एकत्र येऊन काम करतोय. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. या राज्याला सक्षम असं सरकार मिळावं यासाठी मोदींनी आवाहन केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो, काही त्रुटी राहिल्या. कांदा उत्पादक शेतकरी निर्यातबंदीमुळं वंचित राहिला होता, त्याची नाराजी पाहायला मिळाली. आता निर्यात चालू केलेली आहे, असं केंद्राला सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.
जयंत पाटील यांच्यावर टीका
तुम्ही 30-30 लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, वाळव्याच्या इस्लामपूरच्या आणि आष्ट्याच्या बसस्थानकाची अवस्था आहे याचा विचार केलाय का असा सवाल अजित पवार यांनी केला. काळानुरुप आपल्याला बदलावं लागतं, असं अजित पवार म्हणाले. अत्याधुनिक ज्ञान महाराष्ट्रातील, इस्लामपूरच्या मुलामुलींना द्यावं लागणार आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी खमक्या हवा असतो, असं अजित पवार म्हणाले. इस्लामपूरच्या भागातील चांगले कारखाने असताना तुम्हाला चांगला भाव देता येत नाही. यात नेतृत्त्व कमी पडत नाही. त्यांच्या कामात उणीव आपल्याला भासत नाही, असा सवाल अजित पवार यांनी केला. माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखान्याचा बाव 3636 आणि 3571 दिला. अरे दिवाळी सगळ्यांना गोडधोड करुन खायची असते, असं अजित पवार म्हणाले. लोकांचे प्रश्न सोडवा, त्यांना चांगला दर द्या, सगळी सोंग करता येतात, पैशाची सोंग करता येत नाहीत. शेतकऱ्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. बारामतीतील कारखान्यापेक्षा इथली रिकव्हरी जास्त आहे, त्यानुसार इथला दर 3800 रुपये पाहिजे होता, शेतकऱ्यांना 3100 रुपये मिळतात. कुठं गेले पैसे असा सवाल अजित पवार यांनी केला.
पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेत
नेतृत्व विकास करणारे लागतं.. नुसतं काय सांगता... काय बोलता.. असं.. बोलून होत नाही. अरे काय सांगता काय सांगता... मी जे सांगतो तुमच्या डोक्यात घुसत नाही मग काय सांगू असं अजित पवार म्हणाले. जयंत पाटलांच्या गावातील पोलीस स्टेशन आज देखील भाड्याच्या जागेत आहे. त्यांच्या गावातील पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला. कशाला... राज्यातील सर्व पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेत न्यायला अशी टीका अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर करण्यात आली. जयंत पाटील यांनी त्यांच्या व्याहींना एक कारखाना इस्लामपूर आष्टामध्ये टाकायला सांगावं, असं अजित पवार म्हणाले.
उमेदवारांना उभ करायचं आणि त्याचा काटा काढायचा असं केलं जातं. 2017 ला जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदेंना उमेदवारी दिली. अपक्ष उमेदवार उभा करुन त्याचा बकरा करुन टाकला,काय पद्धत आहे, असं अजित पवार म्हणाले. उमेदवार उभा करायचा आणि तिथं मॅच फिक्सिंग करून मिलीभगत करून उमेदवार पाडायचं हे राजकारण जयंत पाटलांचा आहे, असं अजित पवार म्हणाले.
नेताच काट्याने काटा काढायला लागला तर माणसांनी निष्ठा कुणावर ठेवायची, असा सवाल अजित पवार यांनी केला.
इतर बातम्या :