एक्स्प्लोर

वरळी विधानसभा मतदारसंघ | आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे; उमेदवारी कोणाला?

मराठी मतदारांनी आणि वर्षानुवर्षे मुंबईचे रहिवासी असलेल्या मतदारांनी इथे कायमच शिवसेनेला साथ दिल्याचं पाहायला मिळतं. 2009 ची निवडणूक वगळता 1990 पासूनच्या सहा निवडणुकीत इथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे.

रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींचं जाळं,लाभलेला अथांग समुद्रकिनारा आणि मराठी भाषिकांचं प्राबल्य असलेला परिसर म्हणजे वरळी. वरळी (विधानसभा क्र. 182) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे विद्यमान आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत साऱ्यांच्याच नजरा वरळी विधानसभा मतदारसंघाकडे वळल्या नाहीत तरच नवल. मराठी मतदारांनी आणि वर्षानुवर्षे मुंबईचे रहिवासी असलेल्या मतदारांनी इथे कायमच शिवसेनेला साथ दिल्याचं पाहायला मिळतं. 2009 ची निवडणूक वगळता 1990 पासूनच्या सहा निवडणुकीत इथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे. या मतदारसंघात एकूण 247 मतदान केंद्र आहेत. विद्यमान आमदार - सुनील शिंदे, शिवसेना 1985 साली शिवसेनेचे शाखा उपप्रमुख म्हणून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या सुनील शिंदे यांनी2007 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांना पराभूत करुन ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. काही दिवसांपूर्वीच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिंदे यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल 1) सुनील शिंदे, शिवसेना : 60,625 2) सचिन अहिर, राष्ट्रवादी : 37,613 3) सुनील राणे, भाजप - 30,849 4) विजय कुडतरकर, मनसे - 8423 5) दत्तात्रय नवघणे, काँग्रेस - 5941 नोटा -1559 मतदानाची टक्केवारी - 55.93 टक्के आदित्य ठाकरे वरळीतून लढणार? ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते2014 या काळात सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी पराभव केला. आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर आदित्य ठाकरेंना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रमोट केलं जात आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढता यावं यासाठी शिवसेना वरळी विधानसभेतील विरोधक संपवत असल्याची चर्चा आहे. सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश करुन वरळी विधानसभा एक हाती कशी जिंकता येईल यावर शिवसेनेचा भर आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबदल्यात सचिन अहिर यांना विधानपरिषद दिली जाऊ शकते अशीही शक्यता आहे. मात्र असं असलं तरी विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचं पुनर्वसन कसं आणि कुठे करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघांची चाचपणी गेल्या वर्षभरापासून आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. जोगेश्वरी,ते स्वतः राहात असलेला वांद्रे पूर्व इथला खेरवाडी,माहीम, वरळी आणि शिवडी या मतदारसंघाचा प्रामुख्याने विचार झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनंतर वरळी आणि माहीम या दोन मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. वरळीत सुनील शिंदे आणि माहिममध्ये सदा सरवणकर हे पक्षाचे आमदार आहेत. विद्यमान आमदार सुनील शिंदे नाराज सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे वरळीचे आमदार सुनील शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जातं. कोणाचा प्रवेश होतोय हे मला माहित नाही पण पुढचा वरळीचा आमदार मीच असेन, असं सूचक विधान त्यांनी अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी केलं होतं. त्यामुळे सचिन अहिर यांचा शिवसेनेतील प्रवास तितका सोपा असणार नाही. सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश का? 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शिंदे यांनीच सचिन अहिर यांचा वरळी विधानसभा मतदारसंघातील विजयरथ रोखला होता. 2009साली मतदारसंघ फेररचनेनंतर वरळीमध्ये विधानसभा मतदारसंघात काही बदल झाले. त्यानंतर तिथे शिवसेनेची ताकद वाढली. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचे उमेदवार संजय जामदार यांच्यामुळे सचिन अहिर निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर यांनी मंत्रिपदापासून पक्षात विविध पदं भूषवली असली तरी, ते ज्या मतदारसंघात राहतात तिथे शिवसेनेची ताकद आहे. हेच शिवसेनाप्रवेशामागे कारण असू शकते. यंदा विधानसभेला संधी मिळाली नाही तरी भविष्यात त्यांना वरळीतून तिकीट मिळू शकते. विधानसभा निवडणूक 2009 चा निकाल सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस : 52,398 आशिष चेंबुरकर, शिवसेना : 47,104 संजय जामदार, मनसे : 32,542 बीबीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प आणि कोस्टल रोडला विरोध बीबीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प आणि कोस्टल रोडला  मच्छिमारांचा विरोध हे इथले महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांचा विरोध कायम आहे. कोस्टल रोड झाल्यास मच्छिमारांसाठी समस्या निर्माण होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मागच्या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचाही निर्णय घेतला होता. त्यामुळे तीच टांगती तलवार विधानसभा निवडणुकीवरही आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ फोडला खरा, पण पुढे काहीच झालेलं नाही. शिवाय आदित्य ठाकरेंनी वरळी, शिवडीतील बीडीडी चाळीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारसंघ शिवसेनेचाच, पण उमेदवार कोण? गड शिवसेनेचा असला तरी उमेदवार कोण हा पेच पक्षासमोर कायम आहे. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचा पत्ता कट करुन नव्याने दाखल झालेले सचिन अहिर यांना तिकीट देणार की युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे इथून लढवणार याची उत्सुकता इथल्या मतदारांनाही लागली आहे. मात्र स्थानिक असलेल्या सचिन अहिर यांच्या नावावर मतदान करणारे वरळीकर आदित्य ठाकरेंना उमेदवार म्हणून कितपत स्वीकारतील हा देखील प्रश्न आहेच.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget