एक्स्प्लोर

महाआघाडीचा तिढा सुटला, पाहा कुणाला किती जागा मिळाल्या?

महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार पैकी दोन जागा दिल्या आहेत. तरीही त्या दोन जागांचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तरी सांगली, अकोल्यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई : अखेर राज्यातल्या महाआघाडीचं चित्र अखेर स्पष्ट झाल आहे. 48 पैकी 24 जागांवर काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर दोन्ही पक्षांनी 4 जागा आपल्या सहयोगी पक्षांना देण्यात आली आहेत. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमानी या पक्षांचा समावेश आहे. महाआघाडीत पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 जण आहेत. मुंबईत आयोजीत महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. मात्र या पत्रकार परिषदेला राधाकृष्ण विखे-पाटलांनी गैरहजेरी लावली आहे महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार पैकी दोन जागा दिल्या आहेत. तरीही त्या दोन जागांचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तरी सांगली, अकोल्यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार असल्याची चर्चा आहे. तर बहुजन विकास आघाडीला पालघरची एक जागा सोडण्यात आली आहे. तर युवा स्वाभिमानीला अमरावतीची एक जागा महाआघाडीतून देण्यात आली आहे. भाजपकडून साम दाम दंड भेदाचं राजकारण : अशोक चव्हाण सार्वत्रीक निवडणुकांसांठी या महाआघाडीत आणखीण काही पक्षांनी सामील व्हाव पण भाजपकडून साम दाम दंड भेदाचं राजकारण करण्यात येतं आहे. त्याला काही पक्ष बळी पडत असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच भाजप भेदाचं राजकारण करतं मतांमध्ये फूट पाडायचा प्रयत्नसुद्दा केला जात आहे. भाजप-शिवसेना यांसारख्या धर्मांद पक्षांना जनता या वेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भाजप-शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. खोटी आश्वासनं, खोट्या घोषणा देऊन जनतेचा विश्वास घात केला आहे. तर देशातील राजकीय व्यवस्थेला उद्धवस्त करण्याचं काम यांनी केलं असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. VIDEO | अखेर राज्यातल्या महाआघाडीचं चित्र अखेर स्पष्ट | मुंबई | एबीपी माझा  देशाचे पंतप्रधान गुपचूप पाकिस्तनाचा पंतप्रधान शुभेच्छा : जयंत पाटील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुपचूप पाकिस्तनाच्यी पंतप्रधानांना शुभेच्छा देतात अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. नरेंद्र मोदींची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. तसेच महाआघाडीत स्वाभिमानी संघटना आमच्याबरोबर आली आहे. आता आम्ही आणखीन ताकदीने निवडणूक लढवू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. जे महाघाडीत आले नाही ते भाजपचे बी टीम : अजित पवार महाआघाडीच्या चर्चा करताना अनेकदा काहींनी टोकची भूमिका घेतली. काही न काही कारण सांगून महाआघाडी होऊ नये म्हणून भूमिका घेतली. त्यांना भाजप आणि शिवसेनेला फायदा करून घ्यायचा होता. पण सगळ्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन आम्ही एकत्र आलो आहेत. पण जे महाघाडीत आले नाही ते भाजपचे बी टीम असल्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. भाजपत  सगळं चांगलं होत तर बाहेरून लोक का घेतली? तोडफोडाचं राजकारण का केलं? असा सवाल अजित पवार केला आहे. मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली. त्यानंतर, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकारवर टीका केली. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थित होते. राज्यातील महाआघाडी चित्र कसं असेल? काँग्रेस 24 राष्ट्रवादी 20 स्वाभिमानी शेतकरी 2 बहुजन विकास आघाडी 1 युवा स्वाभिमानी 1 VIDEO | माझं पक्षात कुणीही ऐकत नाही, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत? | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Sunetra Pawar: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget