एक्स्प्लोर

Loksabha Election Results 2019 : निकालानंतर सुप्रिया सुळे यांचंं भावनिक ट्वीट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वात सुरक्षित आणि लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक साजरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!", अशा ओळी सुप्रिया यांनी ट्विटरवर शेअर केल्या आहेत. बारामतीसाठी भाजपचा जोर भाजपने बारामती जिंकण्याच्या वल्गना केल्या होत्या. सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार. त्या किती मतांच्या फरकाने हरतील हेच पाहायचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पवारांचा गड जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये तळ ठोकून होते. शिवाय भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, सगळ्यांनी कांचन कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचं चित्र निर्माण करण्यास भाजप यशस्वीही झाली होती. शरद पवाराचं विशेष लक्ष भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याने शरद पवार आणि अजित पवार यांनीही इथे विशेष लक्ष घातले होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी पवारांनी जोरदार प्रयत्न केले होते. अखेर इथल्या विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी "श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!", या ओळी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केल्या आहे. सुप्रिया सुळेंना कडवी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वात सुरक्षित आणि लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा राखला. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंना कडवी लढत दिली. मात्र सुप्रिया सुळे यांनी सुमारे दीड लाखांनी विजय मिळवला. 2014 मध्ये सुळे यांचा सुमारे 69 हजार मतांनी रडतखडत विजय झाला होता. रासपच्या महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंना चांगलंच झुंजवलं होतं.
संबंधित बातम्या
 
महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Embed widget