एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result: ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचा डंका, संजय दिना पाटील 15 हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे मिहीर कोटेचा पिछाडीवर

Maharashtra Politics: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांची मोठी आघाडी

मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून उत्तर मुंबईत लोकसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर पाच मतदारसंघांमध्ये सातत्याने चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांपासून भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य मुंबई लोकसभा (North East Mumbai Loksabha) मतदारसंघात धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी तिसऱ्या फेरीअखेर 15,348 हजार मतांची आघाडी घेतली आहे. हा भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यापूर्वी किरीट सोमय्या आणि मनोज कोटक यांनी प्रतिनिधित्व केले होते. या मतदारसंघात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या मिहीर कोटेचा यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर संजय दिना पाटील हे सातत्याने आघाडीवर आहेत. भाजपने यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातील उमेदवार बदलला होता. संजय दिना पाटील यांचा विजय झाल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का ठरु शकतो.

मुंबईतील इतर मतदारसंघांमध्ये स्थिती काय?

उत्तर मुंबई मतदारसंघ वगळता मुंबईतील अन्य मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. उत्तर मुंबईत भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे तब्बल 38 हजार मतांची आघाडी आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर पिछाडीवर असून रवींद्र वायकर आघाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई आघाडीवर आहेत, तर राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पिछाडीवर असून भाजपचे उज्ज्वल निकम हे आघाडीवर आहेत. 

ईशान्य लोकसभा मतदारसंघातील पहिली फेरी  

एकूण मिळालेली मते 

नंदेश उपम -  ३९०
मिहीर कोटेचा - १९१५८
संजय दिना पाटील - २४०८२

ईशान्य मुंबईतील दुसऱ्या फेरीची मते

संजय दिना पाटील - ५६०३२
मिहीर कोटेचा -   ४३७४४

संजय दिना  १२२८८ मतांनी आघाडीवर

ईशान्य मुंबई तिसऱ्या फेरीची मतं

संजय दिना पाटील - ६७७१७
मिहीर कोटेचा -     ५६२२८

संजय दिना  पाटील ११४८९  मतांनी आघाडीवर

ईशान्य मुंबई  चौथी फेरी

संजय दिना पाटील - ८८४४५
मिहीर कोटेचा -     ७३०९७

संजय दिना पाटील १५३४८  मतांनी आघाडीवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
Embed widget