एक्स्प्लोर
माढ्याच्या जागेवरुन पुन्हा खल, शरद पवारांऐवजी विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा
होय-नाही म्हणत शरद पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. पवारांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
पुणे : माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेच्या उमेदवारीवरुन पुन्हा खल सुरु झालं आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर चर्चा रंगली आहे. माढ्यातील जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठक झाली. विजयसिंह मोहिते-पाटलांना डावलल्यामुळे माढा लोकसभेतल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात माढ्याबाबत पुनर्विचार सुरु असल्याची माहिती आहे.
या बैठीकाला शेकाप नेते गणपतराव देशमुख, माढ्यातील आमदार बबन शिंदे, सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार भारत भालके, कल्याण काळे उपस्थित आहेत.
शरद पवारांसमोर राडा करणारे शेखर गोरे काय म्हणतात?
शरद पवार माढ्यातून फायनल, बैठकीत शिक्कामोर्तब
होय-नाही म्हणत शरद पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. पवारांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही, संघर्ष करुन विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला होता. आता ऐनवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांना डावलून पवारांच्या नावाची घोषणा झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. शरद पवारांऐवजी विजयसिंह मोहिते पाटील? दरम्यान, माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र रणजीत मोहिते-पाटील यांचं नावही चर्चेत आहे. पुण्याच्या बारामती हॉस्टेलमध्ये आज पवारांनी माढ्यातल्या पुढाऱ्यांसोबत बराच वेळ चर्चा केली. मात्र माढ्यातील उमेदवाराच्या पुनर्विचाराच्या बातमीवर अद्याप राष्ट्रवादीकडून दुजोरा मिळालेला नाही. सुभाष देशमुखांचा पवारांना सल्ला शरद पवार यांच्या माढ्यातून माघारीच्या चर्चेवर भाजप मंत्री सुभाष देशमुखांनी शरद पवारांना सल्ला दिला आहे. "शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, ते प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील. भाजपच्या 48 जागा निवडून येतील, असं पवार म्हणाले होते. म्हणून मी पण मोठ्या मनाने पवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करतो. माझ्याकडे सोलापूर आणि माढा या मतदारसंघांची जबाबदारी आहे, मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडायला तयार आहे," असं सुभाष देशमुख म्हणाले.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement