एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास शुक्रवारची पहाट उजाडणार

यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटमधील मतांचीही मोजणी होणार आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. मात्र अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप मोजणीसाठी हा अतिरिक्त वेळ लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी रात्री दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जय-पराजयाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. देशभरातील 543 पैकी 542  मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. त्यानंतर कोणता पक्ष जिंकणार, कोणता पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटमधील मतांचीही मोजणी होणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटीही लावली असून सगळ्यांना याबाबत प्रशिक्षणही दिलं आहे. मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी इथे निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार, निवडणूक एजंट, मोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल. पहाटे निकाल हाती येणार! प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 1 याप्रमाणे 5 मशीनमधील स्लिपची मोजणी शेवटी करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी अतिरिक्त पाच तास लागणार असून अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री 2 वाजतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, काही तांत्रिक कारणावरुन उशीर झाला किंवा कोणी हरकत घेतली तर मतदानयंत्र निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात येईल आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. निकाल येण्यास 14 ते 15 तासांचा अवधी लागणार लोकसभा मतदारसंघनिहाय 22 पासून 40 पर्यंत मतमोजणीचा ईव्हीएम फेऱ्या होणार आहेत. ईव्हीएमची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल. यानंतर व्हीव्हीपॅटचा मोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 650 आणि जास्तीत जास्त 1250 मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी. म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघातल्या 30 व्हीव्हीपॅटची मोजणी होईल. चिठ्ठ्या टाकून व्हीव्हीपॅटची निवड होईल. व्हीव्हीपॅटच्या एका मशीनच्या मोजणीला 45 मिनिटांचा कालावधी लागेल. उमेदवाराने आक्षेप घेतले तर हा कालावधी वाढेल. असा एकूण प्रत्यक्षात निकाल यायला 12 तासापासून 14 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. आधी पोस्टल मतांची मोजणी सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. पोस्टल मतांची खातरजमा करण्यासाठी ईटीपीबीएस पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य लिफाफा, मतपत्रिका असलेला लिफाफा आणि प्रत्यक्ष मतपत्रिका यावरील बारकोड स्कॅन करुन मतपत्रिकेची खात्री झाल्यानंतरच ती मोजणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएमची मोजणी होते. एकाच वेळी जास्तीत जास्त 14 ईव्हीएमची मोजणी केली जाते. कशी होते मतमोजणी? EVM आणि VVPAT मधून असे निकाल जाहीर होणार - यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट जोडलं असून स्लिपची मोजणीही त्याच वेळी होणार आहे. प्रक्रियेनुसार सर्वात आधी EVM वरील CU (कंट्रोल यूनिट) च्या निकालाच्या बटणाने मोजणी होईल. - यानंतर पाचही व्हीव्हीपॅटचे निकाल कंट्रोल यूनिटच्या आकड्यांशी जुळवले जातील. - पिजन होल बॉक्समधील स्लिपच्या संख्येसोबतही मतांची संख्या जुळवली जाईल. मतदान करताना ईव्हीएमच्या उजव्या बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅटमध्ये ही स्लिप दिसली असेल. या स्लिपची मोजणीही मतांच्या मोजणीसोबत झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget