एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुळे कुटुंब अब्जाधीश, सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
महाराष्ट्रात यंदा चार टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. यावेळी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मतदान पार पडेल. सुप्रिया सुळे यांच्या बारामती या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 23 एप्रिलला मतदान होईल. महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी 17 जागांवर मतदान होईल. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
मुंबई : बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदास आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या कोट्यधीश आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळेंनी आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे. सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 58.78 कोटी रुपये आहे. तर सुळे कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता सुमारे 161.27 कोटी रुपयांची आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत सुप्रिया सुळेंच्या संपत्तीमध्ये एकूण 12 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2014 मध्ये त्यांची एकूण संपत्ती सुमारे 46.09 कोटी रुपये होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडे 21.26 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्ता 18.40 कोटी रुपयांची आहे. त्यांच्याकडे 2.70 कोटी रुपये किंमतीची शेतजमीन आहे. तर 1.03 कोटी रुपये किंमतीची बिगर शेतजमीन आहे.
सुप्रिया सुळेंकडे 28 हजार 770 रुपयांची रोकड आहे. त्यांचे पती सदानंद सुळे यांच्याकडे 23 हजार 050 रुपये, मुलगी 28 हजार 900 रुपये आणि मुलगा 13 हजार 600 रुपयांची रोख रक्कम आहे. मात्र सुप्रिया सुळेंवर पार्थ पवार यांचे 20 आणि सुनेत्रा पवार यांचं 35 असं एकूण 55 लाख रुपयांचं कर्ज आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात एकही गुन्हेगारी खटला नाही.
सुप्रिया सुळे या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. सलग दोन टर्म त्या बारामतीच्या खासदार आहेत. बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात 2006 पासून झाली होती. त्यावेळी त्या पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार बनून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचल्या होत्या. तर 2009 मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढल्या आणि लोकसभेच्या खासदार बनल्या.
महाराष्ट्रात यंदा चार टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. यावेळी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मतदान पार पडेल. सुप्रिया सुळे यांच्या बारामती या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 23 एप्रिलला मतदान होईल. महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी 17 जागांवर मतदान होईल. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
सुप्रिया सुळे यांचे दागिने
सोनं - 1717.600 ग्रॅम (52,54, 894 रुपये)
चांदी - 6742.100 ग्रॅम (2,67,533 रुपये)
हिरे - 373 कॅरेट (1,13,82,407 रुपये)
सुप्रिया यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणी मुलगा विजय या चौघांच्या नावावरील एकूण संपत्ती 161.27 कोटी रुपये आहे.
सुप्रिया सुळेंची संपत्ती
2019 मधील संपत्ती - 58,78,75,551.46 रुपये (स्थावर, जंगम, वारसाप्राप्त)
2014 मधील संपत्ती - 46,09,58,751.26 रुपये ( स्थावर, जंगम, वारसाप्राप्त)
एकूण वाढ - 12,69,16,800.20 रुपये
सदानंद सुळेंची संपत्ती
2019 मधील संपत्ती - 893885855.06 रुपये (स्थावर, जंगम)
रेवती सदानंद सुळे
2019 मधील संपत्ती - 8,92,08,145.81 रुपये (जंगम)
विजय सदानंद सुळे
2019 मधील संपत्ती - 4,18,13,449.37 रुपये (जंगम)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement