एक्स्प्लोर

VVPAT मोजणीची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली, फेरफार आढळल्यास VVPAT ची मतं ग्राह्य धरणार

ईव्हीएम सोबत छेडछाड आणि बदल करणे शक्य नाही, अंस मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतजोणीला दोन ते तीन दिवस लागतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आधी पाच VVPAT मशीन्सची पडताळणी करण्यात यावी आणि फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व VVPAT ची मोजणी व्हावी, ही विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतजोणीला दोन ते तीन दिवस लागतील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

VVPAT आणि ईव्हीएम मशीनच्या मतांमधे फेरफार आढळल्यास VVPAT ची मतं ग्राह्य धरली जाणार आहेत. त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व मशीनची मतमोजणी होणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

रविवारी लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस, एसपी, बीएसपी, टीएमसीसह देशातील 22 विरोधीपक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. VVPAT ची पडताळणी करताना जर काही विसंगती आढळली तर सर्व मतदान केंद्रांवर VVPAT चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

ईव्हीएमवरुन गोंधळ झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेते चौकीदार बनले आहे. ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये उमेदवारांनी दौरे सुरु केले आहेत. उमेदवारांनी ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यासाठी आपले प्रतिनिधीही स्ट्राँगरुमच्या जवळ नेमले आहेत.

ईव्हीएम मशीनबाबतच्या आरोपांवर बोलतांना मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं की, ईव्हीएम सोबत छेडछाड आणि बदल करणे शक्य नाही. नवीन ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्यास मशीन फॅक्टरी मोडवर जातं. त्यामुळे ईव्हीएम मशीनशी छेडछाड करणे अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget