एक्स्प्लोर

चौथ्या टप्प्यात दुपारपर्यंत महाराष्ट्रातील राखीव जागांवरील मतदान सर्वाधिक, शहरी मतदारसंघ मात्र पिछाडीवर

राखीव असलेल्या चारही मतदारसंघात 20 टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान झाले आहे. तर शहरी भागात मात्र ही टक्केवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 11 पर्यंत कल्याणमध्ये सर्वात कमी 14 टक्के तर दक्षिण मुंबई 15.51 टक्के मतदान झाले आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील हा शेवटचा टप्पा आहे. महाराष्ट्राच्या या चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 17 पैकी 4 राखीव जागांवरील मतदान सर्वाधिक झाले आहे. राखीव असलेल्या चारही मतदारसंघात 20  टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान झाले आहे. तर शहरी भागात मात्र ही टक्केवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 11 पर्यंत कल्याणमध्ये सर्वात कमी 14  टक्के तर दक्षिण मुंबई 15.51 टक्के मतदान झाले आहे. अर्थात दुपारनंतर मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत आकडेवारी सतरापैकी चार मतदारसंघ राखीव...तेच टॉपर 1.       नंदुरबार                   24.59% 2.       पालघर                              21.46% 3.       दिंडोरी                               21.06% 4.       शिर्डी                      20.55% शहरी मतदारसंघ...मतदानात तळाला! 1.       कल्याण                            13.91% 2.       दक्षिण मुंबई              15.51% 3.       मुंबई उत्तर मध्य                  16.21% 4.       मुंबई दक्षिण मध्य       16.80% लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये  सरासरी 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल होता. महत्त्वाची बाब म्हणजे हातकणंगलेत सर्वाधिक 70.81 टक्के मतदान झालं, तर पुणेकर मतदारांनी मात्र निराशा केली, पुण्यात केवळ 47.97 टक्के मतदान झाले होते. या टप्प्यात कोल्हापूर - 69.51 टक्के, हातकणंगले - 70.81 टक्के, सांगली - 64.45 टक्के , जालना - 64.57  टक्के, अहमदनगर - 63.93 टक्के, माढा - 63.58 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 61.91 टक्के, औरंगाबाद - 61.87 टक्के, बारामती - 60  टक्के, रायगड - 61.94 टक्के, जळगाव -  56.10 टक्के, रावेर -  61.37 टक्के, सातारा - 60.01  टक्के, पुणे - 47.97 टक्के अशी एकूण 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी 62.91 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये हिंगोली - 66.60 टक्के, बीड - 66.08टक्के, उस्मानाबाद- 63.42 टक्के, नांदेड- 65.16 टक्के, परभणी- 63.16 टक्के, लातूर- 62.20 टक्के, बुलडाणा- 63.68 टक्के, अमरावती - 63.86 टक्के, अकोला- 60 टक्के, सोलापूर- 58.45 टक्के अशी मतदारसंघनिहाय टक्केवारी होती. पहिल्या टप्प्यात मतदान पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के मतदान झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget