एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : 2014 मध्ये पहिल्या टप्यातील 91 जागांपैकी काँग्रेस केवळ 7 तर भाजप 32 जागांवर विजयी

सत्ताधारी भाजपने 2014 च्या निवडणुकीत 32 जागांवर विजय मिळवला होता. या टप्प्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट होती. काँग्रेस या 91 जागांवर टीडीपी, केसीआर आणि वाईआएससीच्या देखील मागे होती.

मुंबई  : देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला अर्थात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ आजपासून होत आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान देशातील 20 राज्यांमधील 91 लोकसभेच्या जागांवर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 7 जागांवरच विजय मिळवता आला होता. सत्ताधारी भाजपने 2014 च्या निवडणुकीत 32 जागांवर विजय मिळवला होता. या टप्प्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट होती. काँग्रेस या 91 जागांवर टीडीपी, केसीआर आणि वाईआएससीच्या देखील मागे होती. पहिल्या टप्प्यातील ज्या 91 जागांवर आज मतदान होत आहे. त्यापैकी 32 जागांवर 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला होता. तर तेलगू देसम पार्टी 16 जागा जिंकून दुसऱ्या स्थानी होती. मात्र यावेळी 91 पैकी 25 जागांवर चित्र बदललेलं आहे. 2014 मध्ये टीडीपी भाजपसोबत एनडीएसोबत होतील, मात्र यावेळी ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यातील 91 लोकसभेच्या जागांपैकी भाजपने 32, टीडीपीने 16,  केसीआरने 11, वाईएसआर काँग्रेसने 9, काँग्रेसने 7 तर बीजेडीने 4 जागांवर विजय मिळवला होता. सोबतच शिवसेना, टीएमएसीने प्रत्येकी दोन तर सीपीएम, एलजेपी, एनसीपी, एनपीईपी, एनपीएफ, पीडीपी, एसडीएफ, एएमआयएम या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. 2019 लोकसभासाठी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे. 2019 लोकसभेचा पहिला टप्पा - (91) आंध्र प्रदेश - 24 अरुणाचल प्रदेश - 2 आसाम - 5 बिहार - 4 छत्तीसगढ - 1 जम्मू काश्मिर - 2 महाराष्ट्र - 7 मणिपूर-1 मेघालय - 2 मिझोराम - 2 नागालँड-1 ओदिशा - 4 सिक्कीम - 1 तेलंगणा- 17 त्रिपुरा- 1 उत्तर प्रदेश - 8 उत्तराखंड - 5 पश्चिम बंगाल - 2 अंदमान निकोबार - 1 लक्षद्वीप - 1 संबंधित बातम्या

Loksabha Election 2019 : देशातील 'या' दिग्गजांचं भविष्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार

Lok Sabha Elections 2019 : मतदान ओळखपत्र नसेल तर काय कराल?

'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget