लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांत 5 वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान
Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान आहे. देशात 102 तर राज्यात 5 मतदारसंघात आज मतदान होणार आहे.

Background
Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू होतंय़. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होतंय, एकूण १०२ मतदारसंघात आज मतदार आपला मतदानाचं परम कर्तव्य बजावतील. राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात मतदान होतंय. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत होतेय. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांत 5 वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
रामटेक 52.38 टक्के
नागपूर 47.91 टक्के
भंडारा- गोंदिया 56.87 टक्के
गडचिरोली- चिमूर 64.95 टक्के
आणि चंद्रपूर 55.11 टक्के आहे.
Chhagan Bhujbal Press Conference : छगन भुजबळ लवकरच पत्रकार परिषद घेणार, नेमकं काय सांगणार?
मंत्री छगन भुजबळ आज एक पत्रकार परिषद घेणार आहेत. शध्या महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद चालू आहे. हा तिढा अजूनही सुटलेला नाही. नाशिकमधून राष्ट्रवादीतर्फे भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता भुजबळ पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय सांगणार? असे विचारले जात आहे.




















