Lok Sabha Election MVA & Mahyuti Rally LIVE: महायुती Vs महाविकास आघाडी, हायव्होल्टेज सभा, बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Politics: राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार. बड्या नेत्यांच्या राज्यातील शेवटच्या सभा. मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीचा हायव्होल्टेज सामना.
LIVE
Background
मुंबई: राज्यात येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. आतापर्यंतच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडी (MVA Rally) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) प्रचंड चुरस पाहायला मिळाली. चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात मविआ आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक द्वंद्व रंगले होते. त्यानंतर आता मुंबईत या लढाईचा शेवटचा सामान रंगणार आहे. (Lok Sabha Election 2024)
मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची सभा बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, शरद पवार, संजय राऊत या बड्या नेत्यांची भाषणे होती. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची भाषणे आकर्षणाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंच्या मोदींकडून 5 मागण्या, भरसभेत व्यक्त केल्या अपेक्षा
पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं, त्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा. भविष्यातील पिढ्यांना याबाबत माहिती मिळेल. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत. गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
उबाठा ला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे. रंग बदलणारे सरडे पाहिले, मात्र इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही. काँग्रेसमध्ये उबाठा लोळतायेत. बिघडणारं पोरगं चुकीच्या वाटेला लागलेलं असं आपण म्हणतो. त्यात हे म्हणतात माझा बाप चोरला, अरे हे काय खेळणं आहे का? आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती आहे.
Sanjay Raut : काम धंदा मंदम, जिंदगी झंडम फिरभी घमंडम हा नरेंद्र मोदींचा मंत्र, 4 जून नंतर यांचा घमंड चालणार नाही; संजय राऊतांची टीका
संजय राऊत भाषण -
मोदी शिवतीर्थवरून जाऊन बाळासाहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करणार असं ऐकलं. पण हे करू नका, बाळासाहेबना यातना होतील. ज्यांनी नकली शिवसेना म्हटलं त्यांना बाळासाहेब शाप देतील.
मोदींनी देशासाठी काय केल? त्यांनी एक मंत्र दिला, काम धंदा मंदम, जिंदगी झंडम, फिरभी घमंडम. तुमचा हा घमेंड 4 जून नंतर चालणार नाही.
एकनाथ शिंदेची नकली सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे महाराष्ट्रमध्ये तयार झाले पाप. कालपर्यंत ज्यांना चक्की पिसिंग म्हणत होता आज त्यांचं किसिंग मोदी घेतायत. व्यभिचर करा, बलात्कार करा आणि सत्ता मिळवा, हे राज्य स्वीकारणार नाही. उत्तम चाललेलं सरकार यांनी पाडले, कारण काय तर म्हणे विकास करायचे.
नागपूरचा थकला म्हणून ठाण्याचा आणला, तोही नाही चालला म्हणून बारामतीच आणला आणि नांदेडचा हातही धरला. तरी कमळाबाईच्या पोटी विकास नाही जन्मला.
फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
नालायकांनो मतांसाठी देशाचे आणि शहिदांचा अपमान करू नका. आम्ही उज्जल निकमांसोबत आहोत. आता मतं भेटत नाहीत, त्यामुळं त्यांनी लांगून चालन सुरू केलं आहे. आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं आणि कॅलेंडरवर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. पाकिस्तानचे झेंडे फडकवून मतं मागायची वेळ आली असेल तर राजकारणातून बाहेर पडावे, हे सांगतात वोट जिहाद करा, अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी
उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे
कारण,आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे
काँग्रेस-राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे
मग, तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे....
असे म्हणत रामदास आठवलेंनी कवितेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली.
उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला
पण 4 तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला.. असेही रामदास आठवलेंनी म्हटले.